बोअरवेलच्या खड्ड्यात काम करताना माती कोसळली; ढिगाऱ्याखाली गुदमरून दोघांचा मृत्यू

By संदीप शिंदे | Published: April 16, 2024 05:46 PM2024-04-16T17:46:24+5:302024-04-16T17:48:18+5:30

निलंगा तालुक्यातील वाजंरवाडा शिवारातील घटना

Two died due to suffocation under mud pile while working on borewell | बोअरवेलच्या खड्ड्यात काम करताना माती कोसळली; ढिगाऱ्याखाली गुदमरून दोघांचा मृत्यू

बोअरवेलच्या खड्ड्यात काम करताना माती कोसळली; ढिगाऱ्याखाली गुदमरून दोघांचा मृत्यू

निलंगा (जि.लातूर) : तालुक्यातील वांजरवाडा (शि.) शिवारात बोअरवेलच्या केसिंगचे काम करत असताना अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ११ वाजेच्या सुमारास घडली. योगेश उर्फ बंडू सतीश जाधव (वय ३५) व बसवराज बाळाजी गड्डे (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत.

निलंगा तालुक्यातील वांजरवाडा येथील शिवारात शेतकरी योगेश उर्फ बंडू सतीश जाधव यांच्या शेतातील बोअरवेलच्या सभोवताली गोल आकाराचा पंधरा ते वीस फूट खोल खड्डा खोदून केसिंग काढण्याचे काम सुरु होते. यावेळी योगेश उर्फ बंडू सतीश जाधव व बसवराज बाळाजी गड्डे हे दोघे खड्ड्यात उतरून केसिंग काढत असताना अचानक मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने दोघांचा मंगळवारी सकाळी ११ वाजता गुदमरून मृत्यू झाला. 

परिसरातील नागरिकांनी योगेश जाधव यास निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. दरम्यान, निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मयत याेगेश जाधव यांच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. तर मयत बसवराज गड्डे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. दोघांवरही वांजरवाडा (शि.) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. योगेश जाधव यांच्या घटनेचा निलंगा पोलिसांनी पंचनामा करून सदरील प्रकरण शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे.

Web Title: Two died due to suffocation under mud pile while working on borewell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.