विरोधक कोण याचा विचार करण्याची गरज काय, शाहू छत्रपतींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 01:37 PM2024-03-16T13:37:30+5:302024-03-16T13:37:49+5:30

निवडणूक बिनविरोध होणे लोकशाहीत योग्य नाही

What is the need to think about who is the opponent, Question of Shahu Chhatrapati | विरोधक कोण याचा विचार करण्याची गरज काय, शाहू छत्रपतींचा सवाल

विरोधक कोण याचा विचार करण्याची गरज काय, शाहू छत्रपतींचा सवाल

कोल्हापूर : लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण असणार याचा विचार करण्याची मला गरज काय? अशी विचारणा करून आजपासून मेळावे सुरू झाले असून त्यातून जनतेच्या भावना समजावून घेता येतात, अशी माहिती शाहू छत्रपती यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यू पॅलेस येथे मेळाव्याचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. माजी खासदार संभाजीराजे यांच्यासह कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शाहू छत्रपती म्हणाले, निवडणूक म्हटले की मेळावे बोलवावे लागतात, पहिला मेळावा आज बोलावला आहे. यातून लोकांच्या भावना कळतात आणि दिशा घेता येते. 

तो लोकशाहीचा एक भाग 

महायुतीकडून समरजित घाटगे यांचे नाव पुढे येत असून ‘राजे विरुद्ध राजे’ अशी लढाई होईल का? या प्रश्नांवर ते म्हणाले, तो विचार मला करायची आवश्यकता भासत नाही. तो विचार करत बसण्यात काही अर्थ नाही. लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेत कितीही रिंगणात असू शकतात. तो लोकशाहीचा एक भाग आहे.

चिन्ह आणि पक्ष तुम्हाला माहिती

महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडून आपण लढणार? यावर शाहू छत्रपती म्हणाले, माझा पक्ष व चिन्ह कोणते हे प्रसार माध्यमांना माहिती आहे.

Web Title: What is the need to think about who is the opponent, Question of Shahu Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.