ठळक मुद्देभविष्यात संस्था ग्राहकांच्या सोयीसाठी कोअर बँकीग, एस एम एस ,एबी बी , एन इ एफ टी , आर टी जी एस यासारख्या सेवा सुविधा

वारणानगर : येथील वारणा महिला सहकारी पत संस्थेने १०४ कोटी ठेवीची उदिष्टपुर्ती करून सुमारे ७३ कोटींचे कर्जवाटप करत अहवाल सालात ८१ लाखाचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना १३ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे संस्थाध्यक्षा शोभाताई कोरे यांनी संस्थेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले .

सभेपुढे बोलताना शोभाताई कोरे म्हणाल्या की, पश्चिम महाराष्ट्रात ५० कोटीचे वर ठेवी गोळा करणारी संस्था म्हणून सन्मानीत झाली असून एन पी ए चे प्रमाण शुन्य टक्क्यावर आले असून थकबाकीचे प्रमाणही ७.१५ टक्के झाले आहे . भविष्यात संस्था ग्राहकांच्या सोयीसाठी कोअर बँकीग, एस एम एस ,एबी बी , एन इ एफ टी , आर टी जी एस यासारख्या सेवा सुविधा पुरवण्यात येण्याबरोबरच व्यवसायव्रधीसाठी आणखी शाखांचा विस्तार करण्याचा मानस असल्याचे संस्थाध्यक्षा शोभाताई कोरे यांनी सांगितले .

येथील शास्री भवनात झालेल्या सभेत प्रारंभी दिपप्रज्वलन करून वारणा भजनी मंडळाच्या स्वागतगीताने सभेस प्रारंभ झाला यावेळी कृष्णात माने यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला तर नोटीस वाचन एस वाय ढेरे यांनी केले .याप्रसंगी लेखीका इंदुमती जोंधळे यांनी मार्गदर्शन केले .यावेळी सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .या सभेस सावित्री महिला संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे पतसंस्थेच्या उपाध्यक्षा मंगला पाटील ,संचालिका माधवी देशपांडे ,शशीकला पाटील ,अलका बंडगर ,विद्या कोरे ,संजिवनी सुतार ,शिला पानगावकर,राजश्री कळंत्रे , सल्लागार आर टी पाटील ,अकौ टस आँफीसर के एस पाटील ,आदि उपस्थित होते .सुत्रसंचलन प्रज्ञा कोरे यांनी केले तर आभार राजश्री कळंत्रे यांनी मानले शारदा महाजन यांच्या वंदेमातरमने सभेची सांगता झाली.

 वारणा महिला सहकारी पत संस्थेच्या २८ व्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्षा शोभाताई कोरे , इंदूमती जोंधळे ,शुभलक्ष्मी कोरे आदि
फोटो-१३वारणा महिला पत संस्था