..मग सेवा करायचे विसरून जाता, आरोग्य राज्यमंत्र्यांनी डॉक्टरांना सुनावले खडेबोल

By समीर देशपांडे | Published: December 2, 2022 01:06 PM2022-12-02T13:06:52+5:302022-12-02T13:07:45+5:30

प्रत्येकाला शहरात थांबायचे असेल तर मग ग्रामीण भागात काम कोण करणार?

Union Minister of State for Health Dr Bharti Pawar spoke harshly to the doctor | ..मग सेवा करायचे विसरून जाता, आरोग्य राज्यमंत्र्यांनी डॉक्टरांना सुनावले खडेबोल

..मग सेवा करायचे विसरून जाता, आरोग्य राज्यमंत्र्यांनी डॉक्टरांना सुनावले खडेबोल

Next

कोल्हपूर : प्रत्येकाला शहरात थांबायचे असेल तर मग ग्रामीण भागात काम कोण करणार असा सवाल विचारत एकदा डॉक्टर झाला की सेवा करायचे विसरून जाता असे खडेबोल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सुनावले.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आज, शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी सकाळी सीपीआरमध्ये बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या रोखठोक स्वभावाची ओळख करून दिली. यावेळी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थित होते.

मंत्री डॉ. पवार म्हणाल्या, गरीबांची सेवा करायला म्हणून डॉक्टर होता. परंतू एकदा डॉक्टर झाले की सेवा विसरून जाता. ७० वर्षांपूर्वीचा जमाना गेला आता. जर पुरेसे डॉक्टर नसतील तर रोटेशन लावा. परंतू सर्वांना सेवा मिळाली पाहिजे. मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखायचे असतील तर असा निष्काळजीपणा कसा चालेल अशीही विचारणा त्यांनी केली.

Web Title: Union Minister of State for Health Dr Bharti Pawar spoke harshly to the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.