‘स्वाभिमानी’ला काही फरक पडणार नाही : शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:37 AM2017-08-18T00:37:05+5:302017-08-18T00:37:05+5:30

'Swabhimani' will not make any difference: Shetty | ‘स्वाभिमानी’ला काही फरक पडणार नाही : शेट्टी

‘स्वाभिमानी’ला काही फरक पडणार नाही : शेट्टी

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कोणतीही फूट पडलेली नाही. संघटनेशी ज्यांनी इकडे-तिकडे केले, त्यांची हकालपट्टी झालेली आहे. वाळवा तालुक्यातील शेतकरी माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे कोणीही कोणताही पक्ष काढला तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्याचा फरक पडणार नाही, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता मारला.
येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी सायंकाळी खासदार राजू शेट्टी यांनी वाळवा तालुक्यातील संघटनेचे कार्यकर्ते व शेतकºयांची बैठक घेतली.
यावेळी खा. शेट्टी म्हणाले की, तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणून राजीनामा घेतल्याची सोशल मीडियावर जाहिरातबाजी सुरू आहे. माझे कार्यकर्ते लाख मोलाचे आहेत. माझ्या संघटनेत कोणीही इकडे-तिकडे करणार नाही. तालुक्यातील शेतकरी माझ्या पाठीशी आहेत. त्यांच्याशी मी कधीही बेईमानी करणार नाही. सत्तेसाठी कोणीतरी लाचार झाले असेल, मात्र मी सत्तेचा लाचार नाही. अखेरपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सोडवत राहणार आहे.
यावेळी स्वाभिमानी प्रवासी वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी साठे यांनी खासदार शेट्टी यांच्यासमवेत राहण्याचा निर्णय जाहीर केला. बैठकीस तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शहाजी पाटील, युवा आघाडीचे प्रवीण पाटील, शिवाजी मोरे, प्रकाश देसाई, मधुकर डिसले, राम पाटील, मकरंद करळे, आप्पासाहेब पाटील, सागर पाटील, महेश पाटील, सुरेश आवटी, तात्यासाहेब कोळेकर, रमेश हजारे, पंडित सपकाळ, नामदेव सावंत उपस्थित होते. संघटनेचे प्रवक्ते भागवत जाधव यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. एस. यु. संदे यांनी आभार मानले.
खासदारांचा फेरफटका
खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सायंकाळी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, रिपब्लिकन पक्षाचे अरुण कांबळे, माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे यांच्यासोबत आंबेडकरनाका परिसरातून उपनगराध्यक्ष पाटील यांच्या घरापर्यंत पायीच फेरफटका मारला. उपनगराध्यक्षांच्या घरी चहापान घेतल्यानंतर खासदार शेट्टी यांनी माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, सयाजी जाधव यांच्या कुटुंबाची भेट घ्ंोऊन त्यांचे सांत्वन केले.

Web Title: 'Swabhimani' will not make any difference: Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.