रंकाळ्यासाठी जुजबी प्रयत्न

By admin | Published: December 25, 2014 11:45 PM2014-12-25T23:45:09+5:302014-12-26T00:06:17+5:30

जलपर्णीचा पुन्हा धोका : ५० टक्के ड्रेनेजलाईन बंदच; सांडपाण्यामुळे अवकळा

Strong Attempt for Ranking | रंकाळ्यासाठी जुजबी प्रयत्न

रंकाळ्यासाठी जुजबी प्रयत्न

Next

कोल्हापूर : रंकाळ्यात मिसळणाऱ्या शाम सोसायटी, सरनाईक कॉलनी, परताळा नाला, आदी ठिकाणांच्या मिळून तब्बल ११ ते १२ एमएलडी (दशलक्ष लिटर) मैलामिश्रित सांडपाण्यापैकी तब्बल १० एमएलडी सांडपाणी दुधाळी नाल्याकडे वळविल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरल्यानेच पुन्हा रंकाळ्याला जलपर्णीचा धोका सतावू लागला आहे.
रंकाळा तलावात अद्याप ५० टक्के सांडपाणी मिसळत आहे. यावर तातडीचे उपाय म्हणून महापालिकेने काल, बुधवारपासून जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले आहे. महापालिकेच्या गलथानपणामुळेच रंंकाळा अखेरची घटका मोजत आहे. रंकाळाप्रेमींतून याबाबत कमालीचा संताप व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून मिळालेल्या आठ कोटी निधीपैकी सव्वासहा कोटी रुपये खर्चून रंकाळा ते दुधाळी नाल्यापर्यंत ड्रेनेज लाईन टाकण्यात आली. गेली साडेचार वर्षे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे रंकाळ्याचे दुखणे वाढतच गेले. पाईपलाईनमध्ये खरमाती अडकल्याने मोठ्या प्रमाणात सांडपाणी रंकाळ्यात मिसळू लागले. सांडपाण्याचे दृश्य स्वरूपातील परिणाम आता समोर येऊ लागले आहेत.
रंकाळ्यात सरनाईक कॉलनीतून मिसळणारे पाणी रोखण्यासाठी मातीची पोती भरून दूषित पाणी वेगळे करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. या पाण्याची मोठी दुर्गंधी सुटली आहे.
याठिकाणी जलपर्णी वाढून हे पाणी आता रंकाळ्यात मिसळण्यास सुरुवात झाली आहे. आता जेसीबी यंत्राच्या साहाय्याने केंदाळ व जलपर्णी काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
सुरू असलेल्या या जुजबी प्रयत्नांवरच प्रशासनाची भिस्त असल्याने रंकाळा तलावाला पुन्हा मोठा फटका बसू शकतो, असे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Strong Attempt for Ranking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.