शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदान सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:47 PM2017-11-17T12:47:40+5:302017-11-17T13:04:34+5:30

शिवाजी विद्यापीठाची अधिसभा आणि अन्य अधिकार मंडळांसाठी आज, शुक्रवारी सकाळपासूनच उत्साहाने मतदान सुरु झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी सकाळी शिवाजी विद्यापीठ केंद्रावर पदवीधर गटासाठी मतदान केले. डॉ. डी. वाय. पाटील संकुलाचे अध्यक्ष संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांनीही सकाळीच मतदान के

Shivaji University started voting for enthusiasm for the elections | शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदान सुरु

शिवाजी विद्यापीठाची अधिसभा आणि अन्य अधिकार मंडळांसाठी आज सकाळपासूनच उत्साहाने मतदान सुरु झाले आहे.

Next
ठळक मुद्देशिक्षक गटातून ६0 टक्के मतदान, पदवीधरसाठी प्रचंड उत्साह७२ जागांसाठी १५६ उमेदवार रिंगणात; मतमोजणी सोमवारीराज्यशास्त्राचे अभ्यासमंडळ बिनविरोध

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची अधिसभा आणि अन्य अधिकार मंडळांसाठी आज, शुक्रवारी सकाळपासूनच उत्साहाने मतदान सुरु झाले आहे.

शहरातील सायबर कॉलेज, कॉमर्स कॉलेज, शहाजी कॉलेज येथील मतदान केंद्रावर शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मतदानाला प्रारंभ झाला. पदवीधर गटासाठी उत्स्फुर्तपणे मतदान सुरु झाले आहे. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते या निवडणुकीसाठी सक्रीय झाले आहेत. वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर ते भेटी देत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी सकाळी शिवाजी विद्यापीठ केंद्रावर पदवीधर गटासाठी मतदान केले. डॉ. डी. वाय. पाटील संकुलाचे अध्यक्ष संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांनीही सकाळीच मतदान केले.

पदवीधर गटातून मतदानाला सर्वच केंद्रावरुन उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. शिक्षक गटात आतापर्यंत ६0 टक्के मतदान झाल्याचे समजते.



नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ३३ केंद्रांवर मतदान होत आहे. विविध अधिकार मंडळांच्या ७२ जागांसाठी १५६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ११ अभ्यासमंडळांसह इतर चार गटांतील १६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचा प्रत्यक्ष गाठीभेटी, मोबाईल आणि सोशल मीडियावर प्रचार रंगला होता.

नव्या विद्यापीठ कायद्यानुसार अधिसभा, अभ्यास मंडळे, प्राचार्य, संस्थाचालक, नोंदणीकृत पदवीधर, महाविद्यालय शिक्षक, विद्यापीठ शिक्षक आणि विद्या परिषद (शिक्षक) गटनिहाय निवडणूक होत आहे. यासाठी एकूण १८८ जागा आहेत. त्यांपैकी ११ अभ्यास मंडळे (विभागप्रमुख) आणि संस्था प्रतिनिधी सहा, नोंदणीकृत पदवीधर एक, शिक्षक (अधिसभा) एक आणि प्राचार्य गटातील आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत.


या सर्व गटांतील उर्वरित एकूण ७२ जागांसाठी १५६ उमेदवारांमध्ये लढत रंगली आहे. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी, विद्यापीठ विकास मंच, विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा), विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीसह काही अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठ आणि कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील महाविद्यालयांमध्ये जोरदार प्रचार केला आहे. या उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रचार सुरू होता. दरम्यान, या निवडणुकीसाठी विद्यापीठ प्रशासनाकडून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील मतदान केंद्रावर उत्स्फूर्तपणे मतदान सुरु आहे. मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कुलसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विलास नांदवडेकर यांनी सांगितले की, विद्यापीठातील परीक्षा भवनमध्ये सोमवारी (दि. २०) सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल. यासाठी २० टेबल असणार आहेत.

राज्यशास्त्राचे अभ्यासमंडळ बिनविरोध

विद्यापीठातील ४७ अभ्यास मंडळांसाठी यावेळी निवडणूक होणार आहे. यातील राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राचे धडे देणाºया या अभ्यासक्रमाची निवडणूक बिनविरोध झाल्याची चर्चा काही आश्चर्ययुक्त आणि हलक्या-फुलक्या विनोदी पद्धतीने विद्यापीठात रंगली आहे.

 

 

Web Title: Shivaji University started voting for enthusiasm for the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.