शिवाजी पूल मिनीबस दुर्घटनेवेळी मदतकार्यातील धाडसी तरुणांचा गौरव,पोलिसांकडून प्रशस्तिपत्रक;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:33 AM2018-02-08T01:33:11+5:302018-02-08T01:33:11+5:30

Shivaji bridge proud of the brave youth of the minibus accident, testimonies from the police; | शिवाजी पूल मिनीबस दुर्घटनेवेळी मदतकार्यातील धाडसी तरुणांचा गौरव,पोलिसांकडून प्रशस्तिपत्रक;

शिवाजी पूल मिनीबस दुर्घटनेवेळी मदतकार्यातील धाडसी तरुणांचा गौरव,पोलिसांकडून प्रशस्तिपत्रक;

Next

कोल्हापूर : शिवाजी पूल मिनीबस दुर्घटनेवेळी स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्यात उड्या मारून तिघांचे जीव वाचविणाºया धाडसी तरुणांचा बुधवारी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते शाल, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

शिवाजी पुलावरून दि. २६ जानेवारीच्या रात्री मिनीबस कोसळल्याचे समजताच जुना बुधवार पेठ परिसरातील तरुणांनी नदीकडे धाव घेतली. अंधारात स्वत:चा जीव धोक्यात घालून तरुणांनी पाण्यात उड्या मारून मनीषा वरखडे, मंदा केदारी, प्राजक्ता नागरे यांचे जीव वाचविले. या अपघातात तेराजण ठार झाले. मृतदेह बाहेर काढण्यासाठीही तरुणांनी मदतकार्य केले. पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचले. परंतु जुना बुधवार पेठेतील तरुणांनी तोरस्कर चौकातील कार्यक्रम अर्ध्यावर टाकून सामाजिक बांधीलकी जोपासत अपघातस्थळी धाव घेतली. त्यांच्यामुळेच तीन जीव वाचले, अशा धाडसी तरुणांचा सत्काराचा कार्यक्रम बुधवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात पार पडला.

यावेळी पोलीस अधीक्षक मोहिते यांच्या हस्ते मदतकार्यातील तरुणांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मोहिते यांनी, पोलीस सेवेमध्ये असताना अशा प्रकारची मदत मी पहिल्यांदाच पाहिली आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून दुसºयांचे प्राण वाचविणाºया शूर वीरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तुमचा आम्हाला अभिमान आहे. असेच सहकार्य पोलीस प्रशासनाला मिळो. तुमच्या चांगल्या कामामध्ये पोलिसांचे सहकार्य यापुढे नेहमी असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक सई भोरे-पाटील, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, संजय मोरे, आदी उपस्थित होते.


यांचा झाला गौरव
माजी उपमहापौर दिगंबर राजाराम फराकटे, प्रवीण सदाशिव डांगे, कुणाल राजेंद्र भोसले, सुशांत किशोर महाडिक, महेश सुकुमार शिंदे, केदार सुकुमार शिंदे, योगेश नंदकुमार यादव, विनायक राजेंद्र फलटणे, बाबासो पाटील, सूरज विजय आडगुळे, प्रताप रमेश मोहिते, राकेश रणजित शिंदे, सागर सदानंद गौड, विनायक काशिनाथ नाईक, शुभम राजेश पोवार, अतीश सुरेश घोलप, संताजी फत्तेसिंगराव घोरपडे, राकेश नंदकुमार तिवले, महेश सलगर, सुभाष संजय चव्हाण, संजय दिनकर चव्हाण, सुभाष रामबिंड.

कोल्हापुरातील शिवाजी पूल मिनीबस दुर्घटनेवेळी मदतकार्य करणाºया तरुणांचा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात बुधवारी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी तिरूपती काकडे, डॉ. प्रशांत अमृतकर, सई भोरे-पाटील, तानाजी सावंत, संजय मोरे, आदी उपस्थित होते.



 

Web Title: Shivaji bridge proud of the brave youth of the minibus accident, testimonies from the police;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.