कुरूंदवाड नगरपालिकेत आत्मदहनाचा प्रयत्न-: रखडलेल्या नळ पाणीप्रश्नी शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:55 AM2019-03-01T00:55:40+5:302019-03-01T00:55:46+5:30

शहराची रखडलेली सुधारित नळ पाणीपुरवठा योजना निधी असूनही श्रेयवादातून मार्गी लावण्यात अपयशी ठरल्याने नगराध्यक्षांसह सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी राजीनामा देऊन पालिका बरखास्त करावी, अशी मागणी करत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शिवसेना शहरप्रमुख राजू आवळे यांनी

 Self-effort in Kurundwad Municipal Corporation: Drained tap water dispute, Shivsena's agitation | कुरूंदवाड नगरपालिकेत आत्मदहनाचा प्रयत्न-: रखडलेल्या नळ पाणीप्रश्नी शिवसेनेचे आंदोलन

कुरूंदवाड नगरपालिकेत आत्मदहनाचा प्रयत्न-: रखडलेल्या नळ पाणीप्रश्नी शिवसेनेचे आंदोलन

Next
ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांच्या दालनातील प्रकार

कुरुंदवाड : शहराची रखडलेली सुधारित नळ पाणीपुरवठा योजना निधी असूनही श्रेयवादातून मार्गी लावण्यात अपयशी ठरल्याने नगराध्यक्षांसह सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी राजीनामा देऊन पालिका बरखास्त करावी, अशी मागणी करत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शिवसेना शहरप्रमुख राजू आवळे यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल. अचानक झालेल्या या प्रकाराने गोंधळ उडाला. नागरिक व पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

दरम्यान, शिवसेनेच्या आक्रमकपणामुळे नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी या योजनेबाबत मंगळवारी (दि. ५) पालिकेच्या विशेष सभेत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आवळे शांत झाले. मात्र, निर्णय न झाल्यास बुधवारी (दि. ६) नगराध्यक्ष पाटील यांच्या घरासमोर शिवसेनेच्यावतीने ‘बोंब मारो आंदोलन’ करून तिथेच आत्मदहन करण्याचा इशारा आवळे यांनी दिला. त्यामुळे या योजनेबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्ष पाटील यांची धावपळ उडाली. शहराची सुधारित नळ पाणीपुरवठा योजना गेल्या तीन वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने शिवसेनेच्यावतीने शहरप्रमुख आवळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करीत योजना मार्गी लावण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींवर दबाव आणत आहेत.

सत्ताधारी-विरोधकांत श्रेयवादावरून खेळ सुरू असल्याने गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास आवळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पालिकेवर मोर्चा काढला. नगराध्यक्ष पाटील हे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या कक्षात होते. आवळे यांनी योजनेबाबत कोणता निर्णय घेतला. या योजनेसाठी मोठा निधी असूनही योजना पूर्ण करता येत नसेल तर सत्ताधारी व विरोधकांनी पदाचा राजीनामा देऊन पालिका बरखास्त करण्याची मागणी करत अचानक आवळे यांनी सोबत आणलेला रॉकेलचा डबा अंगावर ओतून घेतला. या प्रकाराने मुख्याधिकारी कक्षात एकच गोंधळ उडाला. पोलीस व नागरिकांनी आवळे यांना आत्मदहनापासून वाचविले.

ठोस निर्णय घेण्यासाठी मंगळवारी बैठक
शिवसेनेच्या आक्रमक आंदोलनामुळे नगराध्यक्ष पाटील यांनी या योजनेवर ठोस निर्णय घेण्यासाठी मंगळवारी पालिकेची विशेष सभा बोलावली असून, योजना पूर्ण करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आवळे शांत झाले. आंदोलनात आप्पा भोसले, सुहास पासोबा, रणजित आवळे, राजू बेले, संतोष नरके, अमित आवळे, अफजल महात, दिग्विजय चव्हाण, आदी सहभागी झाले होते.

कुरुंदवाड येथे गुरुवारी शिवसेनेच्यावतीने पालिकेवर मोर्चा काढण्यात आल्यानंतर आंदोलकांना लेखी आश्वासन देताना नगराध्यक्ष जयराम पाटील, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, दीपक गायकवाड यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title:  Self-effort in Kurundwad Municipal Corporation: Drained tap water dispute, Shivsena's agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.