भाजपच्या विरोधात ताकदीने लढणार : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:37 AM2018-03-14T00:37:54+5:302018-03-14T00:37:54+5:30

आजरा : भाजपने राज्याची आर्थिक स्थिती बिकट केली आहे. भाजपबाबत जनसामान्यांमध्ये नाराजी आहे. त्यांना नामोहरम करण्याची संधी असल्याने आजरा नगरपंचायतीची निवडणूक भाजपच्या विरोधात ताकदीने

Satej Patil will fight against BJP: Satej Patil | भाजपच्या विरोधात ताकदीने लढणार : सतेज पाटील

भाजपच्या विरोधात ताकदीने लढणार : सतेज पाटील

Next
ठळक मुद्देआजरा नगरपंचायत निवडणुकीसाठी निर्धार

आजरा : भाजपने राज्याची आर्थिक स्थिती बिकट केली आहे. भाजपबाबत जनसामान्यांमध्ये नाराजी आहे. त्यांना नामोहरम करण्याची संधी असल्याने आजरा नगरपंचायतीची निवडणूक भाजपच्या विरोधात ताकदीने लढणार असल्याची माहिती काँगे्रसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार पाटील म्हणाले, काँगे्रसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत. निवडणुकीसंदर्भात चाचपणी करण्यासाठी आजचा दौरा आयोजित केला आहे. जे आजच्या बैठकीला उपस्थित नाहीत ते काँगे्रसचे नाहीत. जे भाजपसोबत आघाडी करत आहेत, ते भाजपचे असल्याचे आम्ही मानत आहोत. त्यामुळे आमच्यासोबत राहतील तेच काँगे्रसचे आहेत.
आजºयात काँगे्रसला वातावरण चांगले व पोषक आहे.

आघाडीबाबत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचा प्रस्ताव आहे. याबाबत काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि मी निर्णय घेणार आहोत. यावेळी इच्छुक उमेदवार, तिसरी आघाडी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी कारखाना संचालक विष्णूपंत केसरकर, जि. प. सदस्य उमेश आपटे, युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष विद्याधर गुरबे, तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर, मारुती कांबळे, मिनल इंजल, नौशाद बुढेखान, वृषाल हुक्केरी, निसार लाडजी, आदी उपस्थित होते.

आबिटकर ‘त्यांच्या’सोबत जाणार नाहीत
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकर यांचे वैर सर्वश्रृत आहे. आमदार मुश्रीफ व माझ्यापेक्षाही आमदार आबिटकरांचे वैर अधिक आहे. त्यामुळे आबिटकर भाजपसोबत जाणार नाहीत, असे आपल्याला वाटत असल्याचेही आमदार पाटील यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आपले मत व्यक्त केले.१८ रोजी निर्णय घेणारकुणासोबत आघाडी करायची की स्वतंत्र लढायचे याबाबत १८ मार्चला निर्णय घेणार आहे. १९ मार्चला उमेदवारांचे शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.


 

Web Title: Satej Patil will fight against BJP: Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.