दुहेरीकरणामुळे गुरुवारपर्यंत रेल्वेचा मेगा ब्लॉक, पुणे, कोयना एक्स्प्रेस रद्द; जाणून घ्या बदलले वेळापत्रक

By संदीप आडनाईक | Published: February 17, 2024 12:53 PM2024-02-17T12:53:52+5:302024-02-17T12:54:09+5:30

कोल्हापूर : मध्य रेल्वे पुणे विभागातील पुणे-मिरज रेल्वेमार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे सेक्शनमध्ये रेल्वे ट्रॅकचे दुहेरीकरण आणि विविध अभियांत्रिकी, सिग्नलिंग दूरसंचार कामांसाठी ...

Railway Mega Block, Pune, Koyna Express canceled till Thursday due to doubling | दुहेरीकरणामुळे गुरुवारपर्यंत रेल्वेचा मेगा ब्लॉक, पुणे, कोयना एक्स्प्रेस रद्द; जाणून घ्या बदलले वेळापत्रक

दुहेरीकरणामुळे गुरुवारपर्यंत रेल्वेचा मेगा ब्लॉक, पुणे, कोयना एक्स्प्रेस रद्द; जाणून घ्या बदलले वेळापत्रक

कोल्हापूर : मध्य रेल्वे पुणे विभागातील पुणे-मिरज रेल्वेमार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे सेक्शनमध्ये रेल्वे ट्रॅकचे दुहेरीकरण आणि विविध अभियांत्रिकी, सिग्नलिंग दूरसंचार कामांसाठी गुरुवार, दि. २२ फेब्रुवारीपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या प्रवाशांनी लक्ष द्यावे. काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार, तर काही गाड्या रद्द झाल्या आहेत. दुहेरीकरण, पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हा ब्लॉक घेण्यात आल्यामुळे मध्य रेल्वेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

पुणे एक्स्प्रेस, कोयना रद्द

दि. २० फेब्रुवारी रोजी कोल्हापूर-पुणे, तर २१ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर-पुणे आणि पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द केली आहे. याशिवाय २२ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर-मुंबई आणि मुंबई-कोल्हापूर मार्गांवर धावणारी कोयना एक्स्प्रेस रद्द केली आहे. २३ फेब्रुवारी रोजीची पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेसही रद्द केली आहे.

बुधवार, गुरुवारी या गाड्यांचे बदलले वेळापत्रक

यानिमित्ताने २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी काही रेल्वे शॉर्ट टर्मिनेशन आणि शॉर्ट ओरिजिनेशन केले आहे. यामध्ये कोल्हापूर-सातारा डेमू गाडीचा प्रवास कऱ्हाड येथे संपणार आहे. ही गाडी या दोन दिवशी कऱ्हाड-सातारा दरम्यान रद्द केली आहे. सातारा-कोल्हापूर मार्गावरील ही डेमू गाडीही या दोन दिवसांत कऱ्हाड येथून सुटेल; म्हणजेच ही गाडी सातारा-कऱ्हाडदरम्यान रद्द राहील. 

याशिवाय पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेसचा प्रवास सातारा येथे संपेल; म्हणजेच ही गाडी सातारा-कोल्हापूरदरम्यान रद्द केली आहे. कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस सातारा येथून पुण्याकरिता सोडण्यात येईल म्हणजेच ही गाडी कोल्हापूर-सातारादरम्यान रद्द राहील. २१ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथून सुटणारी गाडी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचा प्रवास पुण्यात संपेल; म्हणजेच ही गाडी पुणे-कोल्हापूरदरम्यान रद्द राहील. २२ फेब्रुवारी रोजी रोजी कोल्हापूर येथून सुटणारी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस पुणे येथून सुटेल म्हणजेच ही गाडी कोल्हापूर-पुणेदरम्यान रद्द राहील.

कोयना एक्स्प्रेस दोन तास उशिरा सुटणार

दि. १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरहून सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस ही गाडी कोल्हापुरातून ८:१५ ऐवजी रात्री १०:१५ वाजता म्हणजेच दोन तास उशिराने सुटेल. याशिवाय दिनांक १९ फेब्रुवारी रोजी पुण्याहून सुटणारी पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस सेक्शनमध्ये एक तासासाठी रेग्युलेट केली आहे.

Web Title: Railway Mega Block, Pune, Koyna Express canceled till Thursday due to doubling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.