चिरीमिरीसाठी ‘कॅसिनो’कडे पोलिसांची डोळेझाक-अनेकांचे संसार उद्ध्वस्त : बेकायदा कोट्यवधींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:59 AM2018-05-12T00:59:57+5:302018-05-12T00:59:57+5:30

कोल्हापूर : गोवा वगळता संंपूर्ण देशभर ‘कॅसिनो’च्या आॅनलाईन गेमला बंदी असताना कोल्हापूर जिल्ह्यात या आॅनलाईन जुगाराला पोलिसांचा राजाश्रय मिळाला आहे. ‘विन लकी, लकी विन, गेम लकी’ या विविध गोंडस

Police detained for casino for 'chirimiri': Many worlds shattered: illegal cahoots turnover | चिरीमिरीसाठी ‘कॅसिनो’कडे पोलिसांची डोळेझाक-अनेकांचे संसार उद्ध्वस्त : बेकायदा कोट्यवधींची उलाढाल

चिरीमिरीसाठी ‘कॅसिनो’कडे पोलिसांची डोळेझाक-अनेकांचे संसार उद्ध्वस्त : बेकायदा कोट्यवधींची उलाढाल

Next
ठळक मुद्देसायबर सेलच्या इच्छाशक्तीची गरज

कोल्हापूर : गोवा वगळता संंपूर्ण देशभर ‘कॅसिनो’च्या आॅनलाईन गेमला बंदी असताना कोल्हापूर जिल्ह्यात या आॅनलाईन जुगाराला पोलिसांचा राजाश्रय मिळाला आहे. ‘विन लकी, लकी विन, गेम लकी’ या विविध गोंडस नावांखाली हा ‘कॅसिनो’ राजरोसपणे सुरू आहे.

रोज करोडो रुपयांची उलाढाल व अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना ‘चिरीमिरी’च्या लालसेपोटी या लुटीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. ‘आॅनलाईन गेम असल्याने कारवाई कशी करणार?’ अशी हतबलता व्यक्त करीत जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करीत आहेत.

कोल्हापूर शहरात फोर्ड कॉर्नर (लक्ष्मीपुरी) येथे देवाच्या नावाचा आधार घेऊन एका लॉटरीचालकाचे ‘कॅसिनो’चे मुख्य केंद्र आहे. तेथूनच या खेळाचे नियंत्रण केले जाते. शहरात फोर्ड कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, कागल, पेठवडगाव, शिरोली, नेर्ली, नागाव, निपाणी, शिणोळीपर्यंत किमान ५० आॅनलाईन गेमची केंद्रे आहेत. याशिवाय पार्वती चित्रमंदिरासमोर ‘टपाल’


पोलिसांचे सुरक्षा कवच
‘कॅसिनो’ जुगार खेळणाऱ्याला मोठी रक्कम लागल्यास खेळणाºयाने स्वत:च्या ताकदीवर ती रक्कम केंद्रचालकांकडून वसूल करायची. खेळणारा कमकुवत व वाद घालत असेल तर केंद्रचालकाकडून फोन करून पोलिसांना पाचारण केले जाते.
विशेष म्हणजे, हा जुगार असूनही येथे पोलीस दिमाखात येऊन केंद्रावर कारवाई करण्याऐवजी वाद घालणाºयाला ‘कायद्या’चा धाक दाखवून पिटाळून लावतात. खेळणारा तक्रारही नोंदवू शकत नाही.

पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर
‘कॅसिनो’ची केंद्रे बऱ्यापैकी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच पोलिसांकडून संरक्षण दिले जाते.
काही अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच लुटीचा आॅनलाईन जुगार सुरू आहे.

पोलीस सायबरची हतबलता

पोलीस दलात ‘सायबर सेल’ हा स्वतंत्र विभाग आहे. त्यात अनेक सायबर स्पेशालिस्टही आहेत. त्यांनी या ‘कॅसिनो’ गेम्सच्या सॉफ्टवेअरचा अभ्यास केल्यास हा ‘कॅसिनो’ मनोरंजनासाठी नसून त्यातून बुकीमालक जुगाराद्वारे कोट्यवधी रुपयांची कमाई करीत असल्याचे धक्कादायक सत्य बाहेर येईल.
पण त्यासाठी अधिकाºयांत छापा टाकण्याच्या इच्छाशक्तीची गरज
आहे. चिनी लिपीत सॉफ्टवेअर
असल्याने या व्यवसायाची पाळेमुळे राज्याच्या वरिष्ठ अधिकाºयांनीच खणून काढण्याची गरज आहे.


‘कॅसिनो’चेही सॉफ्टवेअर : कोल्हापुरात ‘कॅसिनो’ जुगारातील चालकांनी स्वत:च सॉफ्टवेअर तयार करून ‘खेळणारा कंगाल, स्वत: मालामाल’ अशीच निर्र्मिती केली. ‘कॅसिनो’च्या चौघाही केंद्रचालकांनी जिल्हाभर व्याप्ती वाढवून एक टक्का कमिशनवर काउंटर (केंद्रे) दिली; पण त्याचा आउटलेट प्रत्येक बुकीचालकाने आपल्याकडे ठेवला आहे.


कार्यालय येथेही एकाचे केंद्र असून, तिथून कसबा बावडा, शिंगोशी मार्केट, मध्यवर्ती बसस्थानक येथील ‘कॅसिनो’ केंद्रांवर नियंत्रण ठेवले जाते. व्हीनस कॉर्नर येथून मध्यवर्ती बसस्थानक आणि इचलकरंजी, जोतिबा डोंगर (वाडी रत्नागिरी), अर्जुननगर (निपाणी) येथील कॅसिनो केंद्रांवर नजर ठेवली जाते. याशिवाय हातकणंगले, कुरुंदवाड, शिरोळ येथेही ‘कॅसिनो’ची स्वतंत्र केंद्रे आहेत.
लॉटरी व्यवसायावर २८ टक्के ‘जीएसटी’ कर लावल्यामुळे लॉटरीचालक व मटका बुकी ‘कॅसिनो’ आॅनलाईनकडे वळले. पाहता-पाहता या जुगाराने कोल्हापूर जिल्हा व्यापला. त्यात अनेकजण कंगाल झाले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पोलिसांचे आणि मटका व्यावसायिकांचे संबंध यापूर्वीही जगजाहीर होऊन, त्यातून अनेक पोलीस निलंबित होऊन पुन्हा सेवा बजावत आहेत. त्याप्रमाणेही या ‘कॅसिनो’मध्ये ‘चिरीमिरी’साठी कारवाई दाबली जाते. (समाप्त)

Web Title: Police detained for casino for 'chirimiri': Many worlds shattered: illegal cahoots turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.