ड्रेस कोडला विरोध; कोल्हापुरातील शिक्षक येत्या गुरुवारी शाळेत जीन्स घालून येणार

By संदीप आडनाईक | Published: March 26, 2024 06:57 PM2024-03-26T18:57:41+5:302024-03-26T18:57:57+5:30

महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षक संघटनेचा पवित्रा

Opposition to dress code; Teachers in Kolhapur will wear jeans to school next Thursday | ड्रेस कोडला विरोध; कोल्हापुरातील शिक्षक येत्या गुरुवारी शाळेत जीन्स घालून येणार

ड्रेस कोडला विरोध; कोल्हापुरातील शिक्षक येत्या गुरुवारी शाळेत जीन्स घालून येणार

कोल्हापूर : राज्य सरकारने १५ मार्च २०२४ रोजी पोशाख आणि ड्रेस कोडबाबत शिक्षकांना आदेश देणारा शासन निर्णय जारी केला आहे. या आदेशाला विरोध करण्यासाठी सर्व शिक्षक गुरुवार, दि. २८ मार्च रोजी शाळेत जिन्स घालून येणार आहेत. महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीने राज्य सरकारच्या विरोधात हा पवित्रा घेत सर्व शिक्षकांना याआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

जगाच्या अनेक कक्षा रुंदावत असताना शिक्षकांना विविध बंधने घालणे योग्य नाही. योग्य समाजमान्य पेहराव करुनच सर्व शिक्षक शाळेत जातात, असे असताना ड्रेस कोडच्या नावाखाली शिक्षकांना पोशाखाबाबत बंधने घालणे हे काळाला धरुन नाही. यापूर्वी शासनाने शिक्षकाचा फोटो वर्गात लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यालाही सर्व शिक्षक संघटनानी तीव्र विरोध केला होता आणि तो निर्णय हाणून पाडला. हा निर्णयही शिक्षक हाणून पाडतील.

येत्या गुरुवारी २८ तारखेला शहर आणि जिल्ह्यातील शिक्षकांनी शाळेत जिन्स घालून यावे असे आवाहन सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्यावतीने भरत रसाळे, सुधाकर सावंत, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, विलास पिंगळे, दिलीप माने यांनी केले आहे.

Web Title: Opposition to dress code; Teachers in Kolhapur will wear jeans to school next Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.