कोल्हापूरात शिवशाही बसला अपघात, वाहकाचा मृत्यू तर १९ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 08:14 AM2018-10-05T08:14:16+5:302018-10-05T18:01:54+5:30

कोल्हापूरातील किणी टोलनाक्याजवळ मध्यरात्री सव्वा दोन वाजता ट्रक आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहक सागर सुधाकर परब याचा मृत्यू झाला, असून १९ जण जखमी झाले आहेत. 

One person died and 16 others injured in Shivshahi bus accident in Kolhapur | कोल्हापूरात शिवशाही बसला अपघात, वाहकाचा मृत्यू तर १९ जण जखमी

कोल्हापूरात शिवशाही बसला अपघात, वाहकाचा मृत्यू तर १९ जण जखमी

Next
ठळक मुद्देकोल्हापूरात शिवशाही बसला अपघातवाहकाचा मृत्यू तर १९ जण जखमी

किणी/कोल्हापूर - कोल्हापूरातील किणी टोलनाक्याजवळ मध्यरात्री सव्वा दोन वाजता ट्रक आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहक सागर सुधाकर परब याचा मृत्यू झाला, असून १९ जण जखमी झाले आहेत. 

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सावंतवाडीच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसने पाठीमागून ट्रकला धडक दिली. 

सागर सुधाकर परब

पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता हातकणंगले) येथील टोल नाक्यांजवळ थाबंलेल्या कंटेनरला पुणे सावंतवाडी शिवशाही बसने पाठीमागून  जोरदार धडक मारल्याने वाहक सागर सुधाकर परब ( वय ३०, रा. कालेली, ता कुडाळ, जिल्हा सिधुदुर्ग ) याचा  मृत्यू झाला तर १९ जण गंभीर जखमी  झाले असून हा अपघात पहाटे तीनच्या सुमारास झाला आहे. जखमींना कोल्हापूर  सी.पी.आर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

सागर परब हा सावंतवाडी आगाराचा कंडक्टर होता.  याबाबत सावंतवाडी एसटी आगाराचे व्यवस्थापक शकील सय्यद यांनी दुजोरा दिला आहे. सागर याचे बालपण सावंतवाडी गेले होते. त्यामुळे त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी मिळताच सावंतवाडीत शोककळा पसरली आहे. सावंत हे मालवण येथील  सामाजिक कार्यकर्त्या सौ.  शिल्पा खोत यांचे बंधू आहेत तर सिंधूदुर्ग पोलिसात निवृत्त झालेल्या सुधाकर परब यांचे पुत्र आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, महामार्गावरील किणी येथे टोल नाक्याजवळ महामार्गाच्या कडेला थाबंलेल्या (क्रमांक एच आर ८९ बी १६०३  ) कंटेनरला  रात्री दहा वाजता पुण्याहुन कोल्हापूर मार्गे सावंतवाडीला भरधाव वेगाने जात असणारी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या  शिवशाही ( क्रमांक एम एच .वाय .४७१६ ) बसने  पाठीमागील बाजूने जोरदार धडक मारली. धडक जोराची असल्याने थाबंलेला कंटेनर काही अंतरावर जावून महामार्गाच्या कडेला असणाऱ्या नाल्यात जाऊन ऊलटला  तर शिवशाही बसच्या पुढिल बाजूच्या चक्काचूर झाला आहे.


कंटेनरच्या धडकेत मोठा आवाज झाल्याने बस मधील प्रवाशी भयभीत होऊन आरडाओरडा करु लागले. या आवाजाने टोल नाक्यावरील कर्मचारी  व परिसरातील टपरीधारक, प्रवाशांनी आपघात स्थळी धाव घेतली, बसच्या पुढील बाजूला धडक बसल्याने दरवाजा खराब झाल्याने उघडता येत नव्हता , त्यामुळे सपुर्ण प्रवासी अडकून पडले होते. खिडक्याच्या  काचा फोडून त्यांना बाहेर काढण्यात आले.  

जखमी सी.पी.आर येथे उपचारासाठी दाखल

मिलिंद मारुती पंडे (वय ३३ रा.वाघापुर, ता. भुदरगड), शिवराज बसवराज तुकबतमठ (वय ३१) सविता बसवराज तुकबतमठ ( वय ३१), चंदन हितेश देवनाथ (वय ३६), अरुण गुरुगोंडा पाटील (वय ४२,सर्व रा. गडहिंग्लज), पांडुरंग लक्ष्मण जाधव(वय ६२ ). सुनील नारायण शिंदे (वय ४५, दोघेही रा आजरा),  सुरेश सखाराम आरळेकर (वय ८०, नागाळा पार्क, कोल्हापूर), रोहित अनिल कुंभार (वय २०, बापट कॅम्प, कोल्हापूर), टोपन्ना मारुती नाईक ( वय २९  तुरकेवडी, ता.चंदगड), अस्मिता अरविंद मुननकर (वय ५१), अरविंद दत्तात्रय मूननकर (वय ५२, दोघेही रा. कोलगाव, ता.सावंतवाडी), विवेक विकास कालेकर (वय २६, पिंपरी चिंचवड), इरफान इस्माईल सय्यद (वय २८, लाईन बाजार, कोल्हापूर), सीताराम पांडुरंग गावडे (वय ६७, विश्रांतवाडी, पुणे), सुनील तुकाराम पवार (वय ३२, आजरा), महंमद रियाज बागवान (वय २६, चिकोडी), रोहित शांताराम सावंत (वय २२, रा.चौकुळ , माळवाडी, ता. सावंतवाडी) हे गंभीर जखमी झााले. जखमींना कोल्हापूर  सी.पी.आर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या  सर्वांना १०८ व हायवे हेल्पलाईनच्या  रुग्णवाहिकेतुन कोल्हापूर येथे सी.पी.आर मध्ये  उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या अपघाताबाबत बसमधील प्रवाशी रोहित शांताराम सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बस चालक महंमद बागवान( रा. चिकोडी)  याच्याविरोधात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One person died and 16 others injured in Shivshahi bus accident in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.