‘एचआयव्ही’ ची स्वेच्छेने तपासणी करण्यात पुढे, कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 04:18 PM2018-12-01T16:18:39+5:302018-12-01T16:20:33+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अकरा वर्षांत ‘एचआयव्ही’ तपासणी ‘स्वेच्छेने’ करून घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते; तर मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. यंदा ‘नो युवर स्टेटस’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘जागतिक एड्स दिन’ आज, शनिवारी साजरा होत आहे.

Next to the voluntary examination of 'HIV', picture in Kolhapur district | ‘एचआयव्ही’ ची स्वेच्छेने तपासणी करण्यात पुढे, कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र

‘एचआयव्ही’ ची स्वेच्छेने तपासणी करण्यात पुढे, कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र

googlenewsNext
ठळक मुद्दे‘एचआयव्ही’ ची स्वेच्छेने तपासणी करण्यात पुढे, कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र एडस मृत्यूचे प्रमाणही घटले

गणेश शिंदे 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अकरा वर्षांत ‘एचआयव्ही’ तपासणी ‘स्वेच्छेने’ करून घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते; तर मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. यंदा ‘नो युवर स्टेटस’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘जागतिक एड्स दिन’ आज, शनिवारी साजरा होत आहे.

स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्याकडून एड्स्बद्दल सातत्याने होणारी जनजागृती आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाने राबविलेले विविध उपक्रम यांमुळे जिल्ह्यातील एडस संसर्गित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. जिल्हा एचआयव्ही मुक्तीकडे पावले टाकत असल्याचे आशादायक चित्र पाहावयास मिळत आहे.

एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील व जिल्हा कार्यक्रमाधिकारी दीपा शिपूरकर यांनी याबाबतची माहिती दिली.
जिल्ह्यातील समुपदेशन तपासणी केंद्रात (आयसीटीसी) २००७ ला ३८ हजार ४०६ लाभार्थ्यांपैकी ३८६६ एचआयव्ही पॉझिटिव्ह होते. त्यावेळी हे प्रमाण १० टक्के प्रमाण होते व २१० रुग्णांचा मृत्यू झाला होता.

यावर्षी ६५ हजार ४७६ लाभार्थ्यांची तपासणी केली असता ५५५ पॉझिटिव्ह होते. आता ते प्रमाण ०.८५ टक्के इतके कमी झाले आहे; पण मृत्यू २५९ झाले. आज असे दिसून येते की, एचआयव्ही तपासणी करून घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह होणाºयांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होत आहे.

मोहिमेअंतर्गत २००७ ला ३६ हजार २४२ गरोदर स्त्रियांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १३९ स्त्रिया एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या; हे प्रमाण ०.४ टक्क होते. २०१८ ला ४१ हजार २१७ स्त्रियांची तपासणी केल्यावर त्यामध्ये केवळ १७ स्त्रिया पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. हे प्रमाण ०.०४ टक्के इतके कमी झाले. त्यामुळे साहजिकच, बाळांना एचआयव्ही विषाणूविरोधी लस दिल्यामुळे बाळांचे मृत्यू प्रमाण घटले आहे.

ही आहेत कारणे...

सधनता, स्थलांतरित कामगार, पर्यटकांचे प्रमाण, सीमेलगतची भौगोलिक परिस्थिती व केंद्रित लक्ष्यगट ही एचआयव्ही बाधिताची कारणे आहेत. जिल्ह्यामध्ये २६ आयसीटीसी केंद्रे असून या ठिकाणी मोफत समुपदेशन व चाचणी केली जाते.

याचबरोबर ७४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४१३ उपकेंद्रे व साधारणत: १०६ पीपीपी म्हणजे खासगी दवाखाने व प्रयोगशाळा या ठिकाणी एचआयव्हीची तपासणी केली जाते. या सर्वांवर जिल्हा एड्स पथकाद्वारे नियंत्रण राखले जाते.
 

Web Title: Next to the voluntary examination of 'HIV', picture in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.