महापौरपदाचे उमेदवार उद्या निश्चित : कॉँग्रेस-राष्टवादीच्या मुलाखती पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:37 AM2018-05-20T00:37:07+5:302018-05-20T00:37:07+5:30

कोल्हापूर : नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या प्रयत्नांतून ‘संशयकल्लोळ’ निर्माण झालेल्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. २५) होत असून, सत्तारूढ कॉँग्रेस, राष्टवादी आणि विरोधी भाजप-

 Mayor's candidature tomorrow: Congress-NCP's interviews complete | महापौरपदाचे उमेदवार उद्या निश्चित : कॉँग्रेस-राष्टवादीच्या मुलाखती पूर्ण

महापौरपदाचे उमेदवार उद्या निश्चित : कॉँग्रेस-राष्टवादीच्या मुलाखती पूर्ण

Next
ठळक मुद्दे‘भाजप- ताराराणी’च्या आज; नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू

कोल्हापूर : नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या प्रयत्नांतून ‘संशयकल्लोळ’ निर्माण झालेल्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. २५) होत असून, सत्तारूढ कॉँग्रेस, राष्टवादी आणि विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार उद्या, सोमवारी दुपारी निश्चित केले जाणार आहेत. शनिवारी दुपारी कॉँग्रेस इच्छुकांच्या, तर सायंकाळी राष्टवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. भाजप-ताराराणीच्या उमेदवारांच्या मुलाखती आज, रविवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत होणार आहेत. दोन्ही आघाड्यांकडून उद्या, सोमवारी दुपारी उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत.

महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना फोडण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता कॉँग्रेस नेत्यांनीही भाजप-ताराराणी आघाडीतील नाराजांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे सध्या संशयकल्लोळ माजला आहे. नगरसेवकांच्या हालचालींवर नेत्यांचे बारीक लक्ष आहे. कोण कोणाच्या संपर्कात आहे, याची माहिती काढली जात आहे.

अशा या संशयी वातावरणात श्कॉँग्रेसकडून महापौरपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती कॉँगे्रस कार्यालयात पार पडल्या. आमदार सतेज पाटील, शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी महापौर स्वाती यवलुजे, आदी यावेळी उपस्थित होते. शोभा बोंद्रे, जयश्री चव्हाण, उमा बनछोडे, निलोफर आजरेकर, प्रतीक्षा पाटील, दीपा मगदूम, इंदुमती माने अशा सातजणींनी आपण महापौरपदासाठी आपल्या नावाचा प्राधान्याने विचार करावा, असा आग्रह धरला. इच्छुकांना वैयक्तिक न भेटता सातही जणांशी एकाच वेळी आमदार पाटील यांनी चर्चा केली.

महापौरपदासाठी मी इच्छुक आहे, एवढ्या मोजक्या शब्दांत सातही जणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी सातपैकी एकीलाच संधी मिळणार आहे. त्यामुळे एकीला संधी दिल्यावर बाकीच्यांनी नाराज होऊ नये. आपले सहकार्य अपेक्षित आहे, असे आमदार सतेज पाटील असे आवाहन केले. सायंकाळी सात वाजता शासकीय विश्रामगृहावर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आर. के. पोवार, उपस्थित होते. राष्टवादीकडून उपमहापौरपदासाठी सचिन पाटील हे एकमेव इच्छुक आहेत.

घोडेबाजार करणार नाही : सतेज पाटील
महानगरपालिका सभागृहात कॉँग्रेस, राष्टÑवादी आघाडीचे स्पष्ट बहुमत आहे. आमचे बहुमत लक्षात घेऊन भाजप-ताराराणी आघाडीने ही निवडणूक बिनविरोध होण्यास मदत करावी, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. आम्ही घोडेबाजाराच्या विरोधात आहोत. त्यासाठी तर पक्षीय पातळीवर निवडणुका लढलो आहोत; त्यामुळे आम्ही घोडेबाजार करणार नाही, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट के ले.

राष्टवादीत सगळेच अलबेल नाही
राष्टÑवादी कॉँग्रेसच्या नाराज नगरसेवकांवर भाजप-ताराराणी आघाडीच्या नेत्यांचे लक्ष आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता राष्टÑवादीच्या नगरसेवकांची बैठक होती; परंतु सहा वाजले तरी पंधरापैकी पाच-सहा नगरसेवकच उपस्थित होते. वारंवार फोन करून बैठकीला येण्याचे आवाहन केल्यानंतर जेमतेम दहाजण उपस्थित झाले. अजिंक्य चव्हाण, अफजल पीरजादे, महेश सावंत, शमा मुल्ला उपस्थित नव्हते. अनुराधा खेडेकर यांचे पती सचिन हे बैठक संपता-संपता आले. महेश सावंत हे बाहेरगावी गेले असून त्यांनी आपणही उपमहापौरपदासाठी इच्छुक असल्याचे कळविले आहे.

उद्या सहलीवर
कॉँग्रेस-राष्टÑवादीकडूनअर्ज भरल्यानंतर उद्या, सोमवारी सायंकाळनंतर या आघाडीचे नगसेवक सहलीवर जाणार आहेत. भाजप-ताराराणीच्या नगरसेवकांना सहलीवर नेण्याचे अद्याप ठरलेले नाही.

Web Title:  Mayor's candidature tomorrow: Congress-NCP's interviews complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.