पिसाळलेल्या कुत्र्याचा अनेकांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:26 AM2021-04-01T04:26:45+5:302021-04-01T04:26:45+5:30

पिसाळलेल्या कुत्र्याने भुदरगड तालुक्यात मोठा धुमाकूळ घातला असून, सुमारे दहा जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. यातील दोघांवर गारगोटी ...

Many are bitten by stray dogs | पिसाळलेल्या कुत्र्याचा अनेकांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्याचा अनेकांना चावा

Next

पिसाळलेल्या कुत्र्याने भुदरगड तालुक्यात मोठा धुमाकूळ घातला असून, सुमारे दहा जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. यातील दोघांवर गारगोटी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिसाळलेल्या कुत्र्याचा दोनवडे, कडगाव परिसरात वावर आहे. नागरिकांना सावधानतेचा इशारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कदम यांनी दिला आहे.

मंगळवारी कुर, मडीलगे परिसरातील सहा जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. शिवारात असलेल्या वृद्ध, स्त्रिया व लहान बालकांना या कुत्र्याने लक्ष केले आहे. अभिमन्यू भिकाजी सुतार (पुष्पनगर ), चंद्रकांत बापू बिरंबोळे, संदीप भिकाजी अकोळकर, भिकाजी तुकाराम अकोळकर (मडिलगे खुर्द), शिवाजी पांडुरंग हजारे (मडिलगे बुद्रुक), मारुती दादू अकोळकर (कुर) या सात जणांना मंगळवारी चावा घेतला तर बुधवारी आर्यन संदीप पोवार (करडवाडी), वंदना पाटील व एक महिला (पाचर्डे), हरी गायकवाड (दोनवडे) यांना चावा घेतला आहे.

Web Title: Many are bitten by stray dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.