‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ नावीन्यपूर्ण चंद्रकांत पाटील : पर्यटक वाढण्यासाठी उपक्रम; आॅनलाईन नोंदणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:22 AM2018-04-01T01:22:01+5:302018-04-01T01:22:01+5:30

कोल्हापूर : कोल्हापुरातील पर्यटन पाहण्यासाठी येणाऱ्या बाहेरील पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातील ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ हा नावीन्यपूर्ण

 'Kolhapur on the way' Navinpura Chandrakant Patil: Enterprises to grow tourists; Start of online registration | ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ नावीन्यपूर्ण चंद्रकांत पाटील : पर्यटक वाढण्यासाठी उपक्रम; आॅनलाईन नोंदणीस प्रारंभ

‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ नावीन्यपूर्ण चंद्रकांत पाटील : पर्यटक वाढण्यासाठी उपक्रम; आॅनलाईन नोंदणीस प्रारंभ

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापुरातील पर्यटन पाहण्यासाठी येणाऱ्या बाहेरील पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातील ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम असून, तो कोल्हापूरला पर्यटन विश्वात वेगळ्या उंचीवर नेईल, असे गौरवोद्गार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे काढले.
ताराबाई पार्क येथील शासकीय विश्रामगृहाच्या राजर्षी शाहू हॉल येथे ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ या पर्यटन सहलीच्या आॅनलाईन नोंदणी प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ आॅनलाईन नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. प्रमुख उपस्थिती भाजप महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, सरचिटणीस अशोक देसाई, निसर्ग मित्र संस्थेचे अनिल चौगुले, दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके, पर्यावरणपे्रमी उदय गायकवाड, राहुल कुलकर्णी, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, चारुदत्त जोशी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, कोल्हापुरात पर्यटन विकासाची मोठी क्षमता असून, अनेक ठिकाणे पर्यटकांसाठी अनोळखी आहेत. यामधील आठ ठिकाणांचा समावेश असणारी दोन दिवसांची संपूर्णत: मोफत सहल एप्रिल व मे महिन्यांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.१३ एप्रिलपासून दर शुक्रवारी व शनिवारी होणाºया या सहलींचा पर्यटकांना लाभ घेता यावा यासाठी आॅनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या उपक्रमाचा लोकांनी लाभ घ्यावा.

५२७ जणांची आॅनलाईन नोंदणी
एप्रिल व मे महिन्यांत होणाºया या सहलींमध्ये सुमारे १४०० लोकांच्या संपूर्णत: मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत आॅफलाईन झालेल्या नोंदणीमध्ये ५२७ लोकांनी नोंदणी केली आहे. विविध माध्यमांतून झालेल्या प्रसिद्धीमुळे लवकरच आॅनलाईन बुकिंगलाही मोठा प्रतिसाद मिळेल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ या उपक्रमासाठी Unexplored Kolhapur ही वेबसाईट तयार केली असून, त्यावर नोंदणी करावी, तसेच याचे फेसबुक पेजही तयार केल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.


कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहाच्या राजर्षी शाहू हॉल येथे शनिवारी ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ या पर्यटन सहलींच्या आॅनलाईन नोंदणीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी अनिल चौगुले, आर. डी. पाटील, संदीप देसाई, उदय गायकवाड, अमर आडके, आदी उपस्थित होते.

Web Title:  'Kolhapur on the way' Navinpura Chandrakant Patil: Enterprises to grow tourists; Start of online registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.