कोल्हापूर : लांडोरीच्या दोन पिल्लांना जीवदान, शेतकर्‍याची मुक्या प्राण्यांबाबत कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 04:15 PM2018-09-15T16:15:09+5:302018-09-15T16:17:56+5:30

लांडोर या मादी जातीच्या पक्षाचा घातपात झाल्याने, मायेच्या उबेसाठी वनवासी झालेल्या दोन पिल्लांना जीवदान देऊन त्यांना पन्हाळा वनविभागाच्या ताब्यात दिले.

Kolhapur: Livedi's two pupils are alive, farmers give grateful to the animals | कोल्हापूर : लांडोरीच्या दोन पिल्लांना जीवदान, शेतकर्‍याची मुक्या प्राण्यांबाबत कृतज्ञता

निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील मायेच्या उबेसाठी पोरकी झालेल्या लांडोर जातीच्या पिल्लांना पकडून वनविभागाचे कर्मचारी यशवंत पाटील यांना देताना शेतकरी गोरख निकम.

Next
ठळक मुद्देलांडोरीच्या दोन पिल्लांना जीवदानपन्हाळा वनविभागाच्या दिले ताब्यात

पोर्ले तर्फ ठाणे : लांडोर या मादी जातीच्या पक्षाचा घातपात झाल्याने, मायेच्या उबेसाठी वनवासी झालेल्या दोन पिल्लांना जीवदान देऊन त्यांना पन्हाळा वनविभागाच्या ताब्यात दिले.

गेले चार दिवस मायेच्या उबेसाठी चिवचिव करणाऱ्या चार पिल्लांपैकी दोन पिल्ली वन्यप्राण्यांची शिकार झाली. उर्वरित दोन पिल्लांच्या वाट्याला जीवघेण संकट येऊ नये म्हणून निकमवाडीच्या शेतकर्‍याने त्या पिल्लांना पकडून जीवदान दिले. त्यांनी मुक्या प्राण्यांबाबत कृतज्ञता दाखविल्यामुळे निसर्गमित्रांकडून कौतुक व्यक्त केले जात आहे.

अधिक माहिती अशी, पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील शेतकरी गोरख निकम ओढा नावाच्या शेतात वैरण कापण्यासाठी जात होते. चार दिवसांपासून त्यांच्या आजूबाजूला लांडोर जातीची चार पिल्लं चिवचिव करीत घुटमळ असत; परंतु शुक्रवारी सकाळी चार पिल्लांपैकी दोनच पिल्लांचा चिवचिवाटासह नजरेस आलीत. गोरखने आजूबाजूला त्यांच्या आईची शोधाशोध केली; पण त्यांची आई आणि ती पिल्लं आढळून आली नाही.

श्रावण मास समाप्तीनंतर एखाद्या शिकाºयाचा ती लांडोर निशाणा झाली असल्याची शक्यता निसर्गमित्राकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संरक्षक कवच हरपल्याने चार पिल्लांपैकी दोन पिल्लं वन्यप्राण्यांची शिकार झाली. मायेच्या उबेसाठी पोरकी होऊन चिवचिवणाºया पिल्लांची गोरखला दया आली. त्यांनी त्यांना पकडून सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाचे कर्मचारी यशवंत पाटील, तानाजी लव्हटे यांच्याकडे दिली.

शिकारीचं गांभीर्य वनविभागाला आहे?

पन्हाळा तालुक्याला सह्याद्रीच्या रांगेतील डोंगराळ भाग असल्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांचा आढळ जादा प्रमाणात आहे. डोंगराळ भागातील बेसुमार वृक्षतोड झाल्याने वन्यप्राण्यांना गाववेशीवरच्या किंवा शेतवडीतील झाडांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे काही हौशी शिकार्‍याना वन्यप्राण्यांची शिकार करणे सोपे होत आहे. वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी पन्हाळा वनविभाग काही गांभीर्याची पावले उचलणार का?
 

 

Web Title: Kolhapur: Livedi's two pupils are alive, farmers give grateful to the animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.