कोल्हापूर : वीजजोडणी देऊ नये सांगितल्याच्या रागातून मारहाण, आपटेनगर येथील नऊ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 08:14 PM2018-04-17T20:14:50+5:302018-04-17T20:14:50+5:30

आपटेनगर येथील प्लॉटधारकांना वीजजोडणी देऊ नये, असा अर्ज महावितरण विभागाला दिल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत शिवाजी सदाशिव सुतार (वय ४६, रा. सरनाईक कॉलनी, जुना वाशी नाका) हे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला.

Kolhapur: Crime against nine people in Rohtang, Apte Nagar, angry on not asking for electricity connection | कोल्हापूर : वीजजोडणी देऊ नये सांगितल्याच्या रागातून मारहाण, आपटेनगर येथील नऊ जणांवर गुन्हा

कोल्हापूर : वीजजोडणी देऊ नये सांगितल्याच्या रागातून मारहाण, आपटेनगर येथील नऊ जणांवर गुन्हा

Next
ठळक मुद्देवीजजोडणी देऊ नये सांगितल्याच्या रागातून मारहाणआपटेनगर येथील नऊ जणांवर गुन्हा

कोल्हापूर : आपटेनगर येथील प्लॉटधारकांना वीजजोडणी देऊ नये, असा अर्ज महावितरण विभागाला दिल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत शिवाजी सदाशिव सुतार (वय ४६, रा. सरनाईक कॉलनी, जुना वाशी नाका) हे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला.

संशयित आनंदा गायकवाड (रा. उजळाईवाडी), त्यांची पत्नी, प्रकाश सुतार (रा. आपटेनगर), सुतार महिला, बुचडे (रा. राजारामपुरी), विलास नागटिळे (रा. देवणे कॉलनी), कुलदीप पोतदार, सावाजी सावंत (रा. आपटेनगर), मयूर (रा. संभाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांनी शिवाजी सुतार यांना प्लॉटधारकांची बैठक आहे, असे सांगून आपटेनगर येथे बोलावून घेतले.

कळंबा वीज कार्यालयामध्ये प्लॉटधारकांना वीजजोडणी देऊ नये, असा अर्ज का दिला, असे म्हणून त्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप जाधव करत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: Crime against nine people in Rohtang, Apte Nagar, angry on not asking for electricity connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.