ज्योत्स्ना चराटी आजऱ्याच्या पहिल्या नगराध्यक्षपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:09 AM2018-04-13T01:09:54+5:302018-04-13T01:09:54+5:30

Jyotsna Charyati will be the first city in city | ज्योत्स्ना चराटी आजऱ्याच्या पहिल्या नगराध्यक्षपदी

ज्योत्स्ना चराटी आजऱ्याच्या पहिल्या नगराध्यक्षपदी

googlenewsNext


आजरा : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत ताराराणी आघाडी पक्ष पुरस्कृत आजरा शहर विकास आघाडीचे प्रमुख अशोक चराटी यांच्या आघाडीने नगराध्यक्षपदासह १० जागा मिळवून सत्ता मिळविली.
नगराध्यक्षपदाच्या शहर विकास आघाडीच्या उमेदवार ज्योत्स्ना अशोक चराटी यांनी तब्बल ४,५६५ मते मिळवून विरोधी राष्ट्रवादीच्या अलका जयवंत शिंपी यांच्यावर १,५०६ मतांच्या फरकाने विजय मिळविला. शिंपी यांना ३,०५९ मते, तर परिवर्तन आघाडीच्या स्मिता जनार्दन टोपले यांना २,४६८ मते मिळाली.
नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, काँगे्रसचे आमदार सतेज पाटील, जि. प. सदस्य जयवंत शिंपी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राष्ट्रवादी-काँगे्रस-सेना युतीला ६ जागा, तर शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर व माजी सरपंच जनार्दन टोपले यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. १९ अपक्ष उमेदवारांपैकी शकुंतला लक्ष्मण सलामवाडे या एकमेव अपक्ष महिलेने बाजी मारून पहिल्याच सभागृहात जाण्याचा पराक्रम केला.
तिरंगी निवडणूक आणि शहर विकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार सुरेश हाळवणकर, राष्ट्रवादी-काँगे्रस आघाडीच्या प्रचारासाठी आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार मुश्रीफ, आमदार पाटील, के . पी. पाटील, तर परिवर्तनच्या प्रचारासाठी आमदार आबिटकर यांच्या प्रचार सभामुळे निवडणुकीत मोठी चुरस झाली होती.
येथील शासकीय प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी दहा वाजता निवडणूक अधिकारी तथा भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व गडहिंग्लजच्या मुख्याधिकारी सुषमा शिंदे-कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी झाली.
१ ते ९ प्रभागांचा निकाल अवघ्या अर्ध्या तासात, तर १० ते १७ या प्रभागांसह नगराध्यक्षपदाचा निकाल ११.३० च्या सुमारास बाहेर आला. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
शहर विकास आघाडीच्या विजयासाठी चराटी यांच्यासह डॉ. अनिल देशपांडे, विजयकुमार पाटील, रमेश कुरूणकर यांनी, काँगे्रस-राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच्या विजयासाठी शिंपी यांच्यासह मुकुंद देसाई, विष्णुपंत केसरकर यांनी, तर परिवर्तन आघाडीच्या विजयासाठी टोपले यांच्यासह प्रा. अर्जुन आबिटकर, आदमसाब माणगावकर व सहकाºयांनी विशेष परिश्रम घेतले.
चराटींनाच फायदा
आजरा शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी-काँगे्रस आघाडीला परिवर्तन आघाडीने आव्हान दिले होते. अपक्षांचा भरणा आणि तिरंगी सामन्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. मात्र, तिरंगी लढतीचा फायदा चराटी यांनाच झाला.

विद्यमान दोन सदस्य विजयी, चार पराभूत
ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अशोक चराटी व संजीवनी सावंत हे दोघे या निवडणुकीत विजयी झाले, तर विजय थोरवत, संजय इंगळे, नयन भुसारी, मैमुनबी अब्दुलरशीद पठाण हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पराभूत झाले. (सविस्तर निकाल/विश्लेषण - हॅलो ५ वर)
‘संभाजीं’ना साथ नशिबाची
बहुचर्चित प्रभाग २ मध्ये एकूण १० उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी शिवसेनेचे संभाजी पाटील व शहर विकास आघाडीचे नाथा देसाई यांना समान २४० मते मिळाली. त्यामुळे तेथील निकाल चिठ्ठीद्वारे देण्यात आला. प्रज्वल पुरुषोत्तम ढेळके या शाळकरी मुलाने काढलेल्या चिठ्ठीत संभाजी पाटील नशीबवान ठरले.
बाप-लेक सभागृहात
शहर विकास आघाडीचे प्रमुख अशोक चराटी हे प्रभाग ११ मधून, तर त्यांची कन्या ज्योत्स्ना चराटी या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. त्यामुळे चराटी बाप-लेकीचा एकाचवेळी सभागृहात प्रवेश झाला आहे.

Web Title: Jyotsna Charyati will be the first city in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.