सतेज गटाची रसद निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:32 PM2019-04-24T23:32:31+5:302019-04-24T23:32:36+5:30

शिवाजी सावंत लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी : राधानगरी विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत यंदा ७०.७७ टक्के मतदारांनी मतदान केले असून, ...

Judge of the Satage Group Breakthrough | सतेज गटाची रसद निर्णायक

सतेज गटाची रसद निर्णायक

Next

शिवाजी सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : राधानगरी विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत यंदा ७०.७७ टक्के मतदारांनी मतदान केले असून, मतदानाची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे उमेदवारांना कमी मताधिक्य मिळणार आहे. गत २०१४ च्या निवडणुकीत ७४.४६ टक्के मतदारांनी आपल्या मताचा हक्क बजावला होता.
सुरुवातीपासूनच धनंजय महाडिक आणि प्रा. संजय मंडलिक यांच्यात चुरस लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक, तर भाजप-शिवसेना आणि मित्रपक्ष यांचे उमेदवार संजय मंडलिक असे पक्षीय सरळ चित्र दिसत असले तरी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकावल्याने
प्रा. मंडलिक यांना त्यांच्या गटाची बऱ्यापैकी रसद मिळाली.
भुदरगड तालुक्यात गतवेळच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार दिनकरराव जाधव, सतेज पाटील यांना मानणारा सचिन घोरपडे व त्यांचा गट, बिद्रीचे माजी संचालक के. जी. नांदेकर, राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांचा संपूर्ण गट, माजी आमदार बजरंग देसाई यांच्या गटाचे पाठबळ हे खासदार धंनजय महाडिक यांच्या सोबत होते. तर आमदार प्रकाश आबिटकर यांचा गट व भाजप हे गट प्रा. मंडलिक यांच्या पाठीशी होते. त्या निवडणुकीत तालुक्यातून तीन हजारांचे मताधिक्य खासदार महाडिक यांना मिळाले होते.
मात्र, या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव, के. जी. नांदेकर, आमदार सतेज पाटील यांना मानणारा तालुक्यातील संपूर्ण गट हे गट प्रा. संजय मंडलिक यांच्या सोबत राहिले. तर खासदार महाडिक यांच्या सोबत माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई आणि भाजपमधील दोन नेते यावेळी सोबत होते. गटनिहाय ताकद ही प्रा. मंडलिक यांच्या सोबत अधिक प्रमाणात होती. त्यामुळे महाडिक यांचे मताधिक्य टिकविण्यासाठी स्थानिक नेत्यांना जिवाचे रान करावे लागले; परंतु मताधिक्य टिकस्रवण्यात ते कितपत यशस्वी झाले किंवा नाही हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
राधानगरी तालुक्यात प्रा. संजय मंडलिक यांच्या समर्थनार्थ बिद्रीचे माजी संचालक विजयसिंह मोरे, सदाशिव चरापले, अभिजित तायशेटे, नंदकिशोर सूर्यवंशी, सुभाष चौगले (जि. प. सदस्या सविता चौगले यांचे सासरे, सर्व काँग्रेस), भाजपचे बाळासो नवणे सोबत होते.
खास धनजंय महाडिक समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील, माजी आमदार नामदेवराव भोईटे, राजेंद्र भाटळे, संजय कलिकते, सर्व राष्ट्रवादीची नेते मंडळी सोबत होती. पी. डी. धुंदरे, उदय पाटील- कौलवकर, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, हिंदुराव चौगले, सुधाकर साळोखे, जयसिंग खामकर, भोगावतीचे सर्व संचालक, काँग्रेस नेते महाडिक यांच्या सोबत होते.

आजरा तालुक्यात २०१४ च्या निवडणुकीत गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, विष्णुपंत केसरकर, सुधीर देसाई, उमेश आपटे, वसंतराव धुरे ही मंडळी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या सोबत होती. तर जि. प. सदस्य जयवंतराव शिंपी यांनी प्रा. मंडलिक यांना मदत केली होती.
यावेळी अशोक चराटी, शिंपी , उमेश आपटे, विष्णुपंत केसरकर ही मंडळी प्रा. मंडलिक यांच्या सोबत, तर मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई, वसंतराव धुरे, अल्बर्ट डिसोझा ही मंडळी खासदार महाडिक यांच्या सोबत राहिली.
या निवडणुकीत या मतदारसंघात आमदार सतेज पाटील यांचा विरोध हा खास महाडिक यांची डोकेदुखी वाढवणार ठरला आहे. गत निवडणुकीत प्रा. मंडलिक हे या मतदारसंघात २७ हजार
मतांनी पिछाडीवर होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील यांचा गट आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ताकद लावल्याचे दिसून
आले.

Web Title: Judge of the Satage Group Breakthrough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.