कागदपत्रांच्या त्रुटींमुळे मतदार अर्ज अपात्र

By admin | Published: September 12, 2016 12:48 AM2016-09-12T00:48:04+5:302016-09-12T00:48:04+5:30

पालिका निवडणुकीची तयारी : सर्वाधिक फटका जयसिंगपुरातील मतदारांना

Ineligible for voter application due to documentary errors | कागदपत्रांच्या त्रुटींमुळे मतदार अर्ज अपात्र

कागदपत्रांच्या त्रुटींमुळे मतदार अर्ज अपात्र

Next

संदीप बावचे ल्ल जयसिंगपूर
जयसिंगपूर व कुरुंदवाड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये ३५०० हून अधिक नव्याने मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जातील कागदपत्रांच्या विविध त्रुटींमुळे सुमारे ५०० हून अधिक नोंदणी अर्जदारांना येत्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. अपात्र ठरलेले सर्वाधिक मतदार जयसिंगपुरातील आहेत.
नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी विधानसभा मतदारसंघाच्या यादीत नाव नोंदविण्याची मुदत ३१ आॅगस्ट २०१६ पर्यंत होती. जयसिंगपूर व कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मध्ये होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आले होते. त्यासाठी शासनाने प्रत्येक गावात केंद्र सुरू केले होते. १ जानेवारी २०१६ रोजी १८ वर्षे पात्र केलेल्या नागरिकांनी ३१ आॅगस्ट २०१६ अखेर मतदार यादीत नाव नोंदविणे आवश्यक होते. मतदारांच्या नावात किंवा पत्त्यात बदल असल्यास फॉर्म नं. ८, नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म नं.६, तसेच मतदार यादीतून नाव वगळणे याकरिता फॉर्म नं.७ चा वापर करावा. याचबरोबर जयसिंगपूर व कुरुंदवाडमधील सर्वच मतदान केंद्रांवर बीएलओ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडे नाव नोंदणीचे काम होते.
दोन्ही नगरपालिकांच्या क्षेत्रात जवळपास ३५०० हून अधिक जणांनी नमुना ६ अंतर्गत नव्याने मतदार म्हणून अर्ज दिले होते. नाव नोंदणी करीत असताना नावाचा कागदोपत्री पुरावा, वयाचा पुरावा, निवासाचे ठिकाण, तसेच नाव अन्य कोणत्याही मतदार संघात असल्यास भाग ४ नुसार प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक होते. काही अर्जदारांनी आधारकार्ड देखील जोडले आहेत. दरम्यान, जवळपास ५०० हून अधिक जणांनी अपुऱ्या माहितीआधारे अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक विभागाने त्यांचे अर्ज अपात्र ठरविले आहेत. त्यामुळे या नवीन मतदारांना येत्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत अपुरी माहिती जोडल्यामुळे अर्ज अपात्र ठरले आहेत. याबाबतची माहिती नगरपालिकांना कळविण्यात आली आहे, असे निवडणूक नायब तहसीलदार संकपाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.
जबाबदार कोण?
मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत संबंधित बीएलओ अधिकारी कामासंबंधी टाळाटाळ करीत असतील तर नगरपरिषद प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले होते. अर्जासोबत अपुरी माहितीची छाननी झाल्यानंतर संबंधित अर्जदारांना कळविणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. यामुळे अनेकांना त्याचा फटका बसला आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न अर्जदारांतून उपस्थित केला जात आहे.

Web Title: Ineligible for voter application due to documentary errors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.