आजचे राशीभविष्य, ६ जून २०२४: आजचा दिवस लाभदायी, व्यापारात फायदा, स्वास्थ्य उत्तम राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 07:43 AM2024-06-06T07:43:43+5:302024-06-06T07:48:10+5:30

Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, वाचा आजचे राशीभविष्य

Today's Horoscope, June 6, 2024 Today will be auspicious, gain in business, good health | आजचे राशीभविष्य, ६ जून २०२४: आजचा दिवस लाभदायी, व्यापारात फायदा, स्वास्थ्य उत्तम राहील

आजचे राशीभविष्य, ६ जून २०२४: आजचा दिवस लाभदायी, व्यापारात फायदा, स्वास्थ्य उत्तम राहील

मेष: आज स्वतःबद्धलचे विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करावा लागेल. कुटुंबीयांसाठी काही विशेष काम व व्यवहार करावे लागतील. इतरांशी वाद व मतभेद टाळण्यासाठी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा 

वृषभ: आज आर्थिक व्यवहारांचे यशस्वीपणे नियोजन कराल. आर्थिक लाभ संभवतो. उत्साही मन व स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल. आणखी वाचा 

मिथुन: आज आपल्या उक्ती व कृती मुळे काही अडचणी निर्माण होतील. आपला आवेश व उग्रपणा ह्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृतीस त्रास संभवतो. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील. एखादा अपघात संभवतो. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व व्यापारात लाभ होतील. मित्रांसह आनंदात वेळ घालवू शकाल. अविवाहितांचे विवाह ठरू शकतील. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. अचानक धन प्राप्ती होईल. आणखी वाचा 

सिंह: आज आपल्या दृढ आत्मविश्वास व मनोबल ह्यामुळे आपण कामात यशस्वी व्हाल. नोकरी - व्यापार व व्यवसायात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नती संभवते. आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्‍या नातेवाईकां कडून आनंददायी बातमी समजल्याने आपण आनंदित व्हाल. एखाद्या सहलीसाठी खर्च होईल. आणखी वाचा 

तूळ: आज शक्यतो कोणत्याही नवीन कामाचा आरंभ न करणे हिताचे राहील. आपले वक्तव्य व वर्तन नियंत्रणात ठेवल्यास संभाव्य गैरसमज टाळून होणारे नुकसान टाळू शकाल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस आपण आनंद उल्हासात घालवाल. रोजच्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल. मित्रांसह एखाद्या प्रवासास जाल. उत्तम भोजन व नवीन आभूषणे मिळाल्याने आपण खूप आनंदित व्हाल. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस शुभफलदायी आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. प्रतिस्पर्धी व शत्रूवर विजय मिळवाल. आणखी वाचा 

मकर: शारीरिकदृष्टया आळस, थकवा व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाराज होतील. द्विधा मनःस्थितीमुळे निर्णय घेण्यात अडचणी येतील. आणखी वाचा 

कुंभ: आज आपणास स्वभावातील हट्टीपणा सोडावा लागेल. अती भावनाशीलतेमुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. घर व संपत्ती संबंधित कामे सावधपणे करावीत. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. आपली सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार व खंबीर मन ह्यामुळे कार्य चांगल्या प्रकारे करू शकाल. मित्रांसह प्रवास - पर्यटन होऊ शकेल. आणखी वाचा 

Web Title: Today's Horoscope, June 6, 2024 Today will be auspicious, gain in business, good health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app