कत्रांटी कामगारांना रोजंदारी पद्धतीद्वारे समाविष्ट करा

By admin | Published: March 15, 2017 04:08 PM2017-03-15T16:08:55+5:302017-03-15T16:08:55+5:30

दोनशेहून अधिक कंत्राटी कामगारांची वीज मंडळासमोर धरणे

Include Katratti workers by a wage system | कत्रांटी कामगारांना रोजंदारी पद्धतीद्वारे समाविष्ट करा

कत्रांटी कामगारांना रोजंदारी पद्धतीद्वारे समाविष्ट करा

Next

आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : वीज उद्योगातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्यातील रिक्त पदांवर हजारो कंत्राटी कामगार गेली अनेक वर्षे सातत्याने काम करीत आहेत. या कामगारांना रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे समाविष्ट करा. यासह विविध मागण्यांसाठी महारार्ष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्यावतीने ताराबाई पार्क येथील महावितरणच्या कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र वीज कंत्रांटी कामगार संघ व वीज कामगार महासंघ या वषार्नुवर्षे काम करणा?्या कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी रोजगाराच्या हमीसाठी पुर्वीच्या विद्यूत मंडळातील रोजंदारी कामगार पद्धत चालू करण्यासाठी र्प्रयत्न करत आहे. या कामगारांसाठी प्रशासनानेच काढलेल्या वेतनविषयक परीपत्रकांचे अननुपालन र्प्रशासन करत नाही. प्रशासन ातील काही अधिका?्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कंत्रांटदार हे कामगारांची मोठ्या र्प्रमाणात अर्थिक पिळवणूक करीत आहेत. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करुन देखील अनेक ठिकाणी वेतनन वेळेत मिळत नाही. यासह बोनस, भविष्य निर्वाह निधीच्या रककमाही खात्यात जमा होत नाहीत. यासह सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा व महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानूसार समान काम वेतन तातडीने लागू करावे. कंत्राटी कामगारांच्या वेतनविषयक परिपत्रकांचे अनुपालन न करणा?्या प्रशासकीय अधिका?्यांवर कारवाई करावी.
यासर्व अन्यायाविरोधात व प्रमुख मागण्यांसाठी वीज कंपनीचे मुख्य कार्यालय प्रकाशगड, मुंबई येथे बुधवारी (दि. २२) पासून महाराष्ट्रातील सर्व कामगार बेमुदत आंदोलन केले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरातही बुधवारी हे आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन संघटनेचे अध्यक्ष मिलिंद कुडतरकर, उपाध्यक्ष अनिल लांडगे, क्षेत्रिय सचिव अमर लोहार, मधुकर माळी, यांनी केले. या आंदोलनात दोनशेहून अधिक कंत्राटी कामगार सहभागी झाले होते.

Web Title: Include Katratti workers by a wage system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.