‘आडवाटेवरचं कोल्हापूर’चे मोफत दर्शन-चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून ‘हिल रायडर्स’चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:47 AM2018-03-29T00:47:50+5:302018-03-29T00:48:27+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास व्हावा व दुर्लक्षित पर्यटनस्थळे व त्यांचा इतिहास लोकांसमोर येण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून पर्यटकांसाठी मोफत

 'Hill Raiders' initiative, under the inspiration of Dr Patil,' Free Kolhapur on the way | ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’चे मोफत दर्शन-चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून ‘हिल रायडर्स’चा पुढाकार

‘आडवाटेवरचं कोल्हापूर’चे मोफत दर्शन-चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून ‘हिल रायडर्स’चा पुढाकार

Next
ठळक मुद्दे १३ एप्रिलपासून दोन बसेस धावणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास व्हावा व दुर्लक्षित पर्यटनस्थळे व त्यांचा इतिहास लोकांसमोर येण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून पर्यटकांसाठी मोफत ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ दर्शनाचा उपक्रम सुरू केल्याची माहिती विद्याप्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे,हिल रायडर्स फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. दि. १३ एप्रिलपासून शुक्रवार व शनिवारी दोन-दोन बसेस सुटणार असून, यामध्ये ५० टक्के स्थानिक पर्यटकांना, तर उर्वरित बाहेरील पर्यटकांना राखीव राहील, असेही त्यांनी सांगितल.

हिल रायडर्स फौंडेशन, एक्टिव्ह चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सहलीचे आयोजन केले असून, हॉटेल मालक संघ, विविध संघटना, बचत गटांचे सहकार्य लाभल्याचे सांगत पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड म्हणाले, कोल्हापुरात पर्यटक आला की जोतिबा, अंबाबाई, नृसिंहवाडी येथेपर्यंत मर्यादित राहतो; पण कोल्हापूरच्या दुर्गम डोंगरांत अनेक छुपी पर्यटनस्थळे आहेत. प्राचीन गुहा, गड, शिल्पे, युद्धभूमी, मंदिरे, जंगले यांचे दर्शन पर्यटकांना व्हावे, पर्यटनस्थळे सक्षम होतीलच पण तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होईल, यासाठी पालकमंत्री पाटील यांनी ही संकल्पना पुढे आणली.
निसर्गमित्र अनिल चौगुले म्हणाले, सहलीचा मार्ग निसर्गरम्य आहे. शिवडाव येथील देवराई व तेथील लोकांचे नाते वेगळे आहे. येथे पंचमहाभूतांचा अनुभव येतो, इतका सुंदर परिसर आहे. अशी अनेक ठिकाणे आपण या माध्यमातून पाहू शकता. यावेळी सुजय पित्रे, राहुल कुलकर्णी, चारूदत्त जोशी, आदी उपस्थित होते.

आॅनलाईन बुकिंग
दोन दिवसांची मुक्कामी सहल, निवास, भोजन व्यवस्था मोफत आहे. आॅनलाईन बुकिंग करून यामध्ये सहभागी होता येणार असून, बुकिंगनुसारच पर्यटकांना संधी दिली जाणार आहे. एका सहलीत शंभर व्यक्ती सहभागी होऊ शकतात. बुकिंगसाठी www.unexploredkolhapur.com वर नोंदणी करायची आहे. त्याशिवाय याबाबत अधिक माहितीसाठी समित अ‍ॅडव्हेंचर्स (पर्ल हॉटेलजवळ, कोल्हापूर). येथे संपर्क साधावा.

असे आहे नियोजन-
वार तारीख कोणासाठी
शुक्रवार १३ एप्रिल फक्त पुरुष
शनिवार १४ एप्रिल फक्त महिला
शुक्रवार २० एप्रिल फक्त पुरुष
शनिवार २१ एप्रिल फक्त महिला
शुक्रवार २७ एप्रिल सहकुटुंब
शनिवार २८ एप्रिल फक्त पुरुष
शुक्रवार ४ मे फक्त पुरुष
शनिवार ५ मे फक्त महिला
शुक्रवार ११ मे फक्त पुरुष
शनिवार १२ मे फक्त महिला
शुक्रवार १८ मे सहकुटुंब
शनिवार १९ मे फक्त पुरुष
शुक्रवार २५ मे फक्त महिला
शनिवार २६ मे सहकुटुंब

अस्सल ग्रामीण नाष्टा-जेवण
चहा-नाष्टा व दोन्ही वेळचे जेवण मोफत दिले जाणार आहे. तेथील अस्सल पारंपरिक जेवण स्थानिक बचतगट देणार आहेत. त्यामध्ये नाचणीची भाकरी, डांगर, पिठल्याचा आस्वाद घेता येणार आहे.

असा असणार सहलीचा मार्ग-
दसरा चौक-पोहाळे (ता. पन्हाळा) लेणी-शिवाजीची विहीर-पावनखिंड, येळवण जुगाई मंदिर-अणुस्कुरा जंगलात पदभ्रमंती-तिसंगी (जेवण)-पळसंबा शिल्प- सांगशी-बोरबेट जंगलातून चक्रेश्वरवाडी-काळम्मावाडी (रात्रीची विश्रांती)-कडगाव, पाटगाव मौनी महाराज मठाचे दर्शन-शिवडाव येथील देवराई, मेघोली-शिरसंग येथील वटवृक्ष-नेसरी-कोल्हापूर.

आडवाटेवरची वैशिष्ट्ये-
राष्ट्रीय  अभयारण्याचा अनुभव
६०० पैकी १०० किलोमीटरचा जंगलातून प्रवास
तीन किलोमीटरची जंगलातून पदभ्रमंती
प्राचीन गुहा, शीलालेख, वास्तू मंदिरे असा पुरातत्त्व ठेवा
रोमांचकारी युद्धभूमीच्या परिसराला भेट
सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून भव्य पठार, खोल दऱ्या व समृद्ध जंगलाचा नजराणा.
‘रानमेवा’ चाखण्याची संधी
चक्रेश्वरवाडी येथे ३६० डिग्रीमधून आकाशाचे निरीक्षण

Web Title:  'Hill Raiders' initiative, under the inspiration of Dr Patil,' Free Kolhapur on the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.