काँग्रेस आमदारांच्या 'नियोजन'वरील बहिष्कारावर पालकमंत्री, खासदार महाडीकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

By इंदुमती सूर्यवंशी | Published: January 8, 2024 06:20 PM2024-01-08T18:20:54+5:302024-01-08T18:21:25+5:30

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वाटपातील भेदभावामुळे काँग्रेस आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेवर टाकलेल्या बहिष्कारावर पालकमंत्री हसन मुश्रीफ ...

Guardian Minister, MP Mahadik reacted to Congress MLAs boycott of District Planning Meeting' | काँग्रेस आमदारांच्या 'नियोजन'वरील बहिष्कारावर पालकमंत्री, खासदार महाडीकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

काँग्रेस आमदारांच्या 'नियोजन'वरील बहिष्कारावर पालकमंत्री, खासदार महाडीकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वाटपातील भेदभावामुळे काँग्रेस आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेवर टाकलेल्या बहिष्कारावर पालकमंत्री हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडीक यांनी दोन विरोधी वक्तव्यं आज, सोमवारी केली. खासदार महाडीक यांनी हा काँग्रेस नेत्यांचा रडीचा डाव असल्याची टीका केली. तर मंत्री मुश्रीफ यांनी, बहिष्कार नव्हे तर वैयक्तिक कारणामुळे सभेला येणे शक्य नव्हते, म्हणून बहिष्काराचे गोंडस नाव दिले असे मत मांडले.

विकास कामांसाठी केवळ १० टक्के निधी दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेस आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेवर बहिष्कार घातला. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, ​​​ बहिष्कार वगैरे काही नाही, माझी कालच आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा झाली त्यांना एका कामानिमित्त बाहेर जायचे होते, तर पी. एन. पाटील यांचा संगमनेरमध्ये सहकारभूषण पुरस्काराने सन्मान होणार होता. बहिष्काराच्या गोंडस नावाखाली ते निभावून नेत आहेत. यावर पत्रकारांनी त्यांना विरोधी नेते निधीसाठी न्यायालयात जाणार आहेत असे सांगितल्यावर ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी वाटपाचे जे सुत्र होते तेच सुत्र महायुतीच्या काळातही वापरले आहे. गेल्यावेळच्या प्रमाणेच आम्ही निधी दिला आहे. विकास कामांसाठी निधी कमी पडतो हे खरे आहे म्हणूनच दुप्पट रकमेची मागणी करणार आहे. 

खरे तर त्यांना लोकांची कामे करायची नाहीत

खासदार महाडीक म्हणाले, हा बहिष्कार म्हणजे काँग्रेसचा रडीचा डाव आहे. अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी १० टक्केच काय १० रुपये आम्हाला मिळाले नाहीत, तेंव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो. त्यामुळे आता त्यांना हट्ट करण्याचा किंवा जादा निधी मागण्याचा अधिकार नाही. १० टक्के निधीमध्येसुद्धा कोट्यावधी रुपये मिळतात, अनेक कामे करता येतात. तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे, त्यामुळे बहिष्कार घालणे चुकीचे आहे. लोकप्रतिनिधींनी असे करणे योग्य नाही, खरे तर त्यांना लोकांची कामे करायची नाहीत. लोकांसमोर जायचे नाही.

Web Title: Guardian Minister, MP Mahadik reacted to Congress MLAs boycott of District Planning Meeting'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.