नशीब लिहिताना परमेश्वर मला विसरला होता, संजय घाटगेंनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 01:41 PM2023-12-26T13:41:37+5:302023-12-26T13:42:22+5:30
बुडणाऱ्यांना वाचविणे, हा ‘पी.एन.’ साहेबांचा स्वभाव
![God had forgotten me while writing destiny, Sanjay Ghatge expressed regret | नशीब लिहिताना परमेश्वर मला विसरला होता, संजय घाटगेंनी व्यक्त केली खंत God had forgotten me while writing destiny, Sanjay Ghatge expressed regret | नशीब लिहिताना परमेश्वर मला विसरला होता, संजय घाटगेंनी व्यक्त केली खंत](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/sanjaay-baba-ghadge-kagal_2023121146328.jpg)
नशीब लिहिताना परमेश्वर मला विसरला होता, संजय घाटगेंनी व्यक्त केली खंत
कोल्हापूर : आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला, अजूनही तो संपलेला नाही. नशिबाची साथ अजून लाभलेली नाही. परमेश्वर नशीब लिहिताना मला विसरला होता की काय, अशी खंत माजी आमदार संजय घाटगे यांनी सतेज कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभात व्यक्त केली.
भाषणाच्या सुरुवातीला आमचे सर्वेसर्वा असा आमदार पी.एन. पाटील यांचा उल्लेख करत, त्यांच्या दातृत्वाविषयी बोलताना संजय घाटगे म्हणाले, सतेज कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने आमदार पाटील यांच्यासोबत येण्याचा चांगला योग आला. ‘पी.एन.’ साहेबांनी एकदा शब्द दिला की, त्यासाठी काय वाटेल ते करतात. स्वत: बुडणार, पण बुडणाऱ्यांना वाचविणार, अशी त्यांची भूमिका राहिली आहे, पण साहेब आता पुन्हा बुडू नका.
‘सतेज’ यांनी थोडी सावली धरावी
आयुष्यभर सत्तेच्या विरोधात राहिलो. पी.एन. पाटील यांनी अनेक वेळा साथ दिली. आता सतेज पाटील यांनी थोडी सावली धरली, तर खूप मोठे काम होईल, असे संजय घाटगे यांनी सांगितले.