Kolhapur- पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग: टोप येथे उड्डाणपूलाचे काम सुरू, ग्रामस्थांची मागणी अखेर पुर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 04:54 PM2024-03-29T16:54:37+5:302024-03-29T16:56:08+5:30

सतीश पाटील शिरोली : टोप येथील ३५० मिटरच्या उड्डाणपूलाचे काम सुरू झाले असून. १२ पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार ...

Flyover work started at Top on Pune Bangalore National Highway | Kolhapur- पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग: टोप येथे उड्डाणपूलाचे काम सुरू, ग्रामस्थांची मागणी अखेर पुर्ण

Kolhapur- पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग: टोप येथे उड्डाणपूलाचे काम सुरू, ग्रामस्थांची मागणी अखेर पुर्ण

सतीश पाटील

शिरोली : टोप येथील ३५० मिटरच्या उड्डाणपूलाचे काम सुरू झाले असून. १२ पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. सध्या मुख्य महामार्गावरील वाहतूक दोन्ही सेवा मार्गावरुन वळवली आहे. 

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सध्या सहा पदरीचे काम सुरू आहे. टोप येथे ३५० मिटरचे जायला आणि यायला असे दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी रोडवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. 

टोप हा अपघाताचा ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जातो. दोन्ही बाजूला उतार  आणि दोन्ही बाजूला वळणाचा रस्ता असल्याने तसेच रहदारी, महामार्गा लगत नागरी वस्ती, शाळा, गावगाडा चालणारी ग्रामपंचायत, मुख्यतः जोतिबा डोंगरावर जाणारा मार्ग, दोन्ही बाजूला हाॅटेल, धाबे, आठवडी बाजार, क्रशर आणि दगड खाण व्यवसाय , उद्योग कारखाने याठिकाणी असल्याने हा टोप फाटा कायमच गजबजलेला असतो. महामार्गा मुळे टोप गावचे झालेले पूर्व पश्चिम विभाजन त्यामुळे या ठिकाणी सतत अपघात होतात.‌‌ 

टोप येथे  जेव्हा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू होते तेंव्हाच हा उड्डाणपूल होणे गरजेचे होते. सन २००२ ते २००६ या काळात टोप ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी उड्डाणपूलाची मागणी उचलून धरली होती.‌ पण सहापदरी रस्ता होणार त्यावेळी आपण उड्डाणपूल करु असे आश्वासन दिले होते. पण गेल्या २० वर्षात याठिकाणी अनेक अपघात होवून कित्येकांचे प्राण गेले. अनेकजण जायबंद‌ झाले. 

पण सध्या सहापदरीकरण सुरू आहे. आणि टोप बाजार कट्टा ते बिरदेव मंदिर पर्यंत असा ३५० मिटरचे दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. हे उड्डाणपूल पिलर वरती उभारण्यात येणार असून त्यासाठी एकूण १२ पिलर उभारले जाणार आहेत. तसेच स्थानिक लोकांसाठी सेवामार्ग आणि जोतिबा डोंगरावर , कासारवाडी, सादळे मादळे, पन्हाळा जाण्यासाठी या उड्डाणपूला खालून रस्ता देण्यात येणार आहे. या उड्डाणपूलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रोडवेज कंपनीचे आहे. या उड्डाणपूला मुळे टोप गावचा मोठा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न सुटणार आहे.


टोप मध्ये उड्डाणपूल झाले पाहिजे यासाठी  पहिल्या पासून आमची मागणी होती. सध्या उड्डाणपूलाचे काम सुरू झाले आहे. टोप चा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.  हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. - तानाजी पाटील, सरपंच, टोप  
 

टोप येथील उड्डाणपूलाच्या कामाला सुरुवात झाली असून महामार्गावरील वाहतूक दोन्ही सेवा मार्गावर वळवली आहे. उड्डाणपूल लवकर पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. तो पर्यंत वाहनधारकांनी वाहने सावकाश चालवावीत. - वैभवराज पाटील, रोडवेज कंपनी प्रकल्प अधिकारी

Web Title: Flyover work started at Top on Pune Bangalore National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.