देवकर पाणंदमध्ये घरफोडी, लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 06:28 PM2019-03-05T18:28:20+5:302019-03-05T18:29:19+5:30

सरदार पार्क, देवकर पाणंद येथील बंब बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे गंठण, अंगठी, चांदीचे करंडे असा सुमारे लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले. हा प्रकार १ ते ३ मार्च या कालावधीत घडला. घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांत भीती पसरली आहे.

Devkar is lodged in the village of Panand | देवकर पाणंदमध्ये घरफोडी, लाखाचा ऐवज लंपास

देवकर पाणंदमध्ये घरफोडी, लाखाचा ऐवज लंपास

googlenewsNext
ठळक मुद्देदेवकर पाणंदमध्ये घरफोडी, लाखाचा ऐवज लंपासचार दिवसांत देवकर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

कोल्हापूर : सरदार पार्क, देवकर पाणंद येथील बंब बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे गंठण, अंगठी, चांदीचे करंडे असा सुमारे लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले. हा प्रकार १ ते ३ मार्च या कालावधीत घडला. घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांत भीती पसरली आहे.

अधिक माहिती अशी, वैभवी प्रसाद मायनेकर (वय ३६) यांचे पती टपाल कार्यालयात लिपिक आहेत. सासूचा अपघात झाल्याने त्यांना पाहण्यासाठी मायनेकर कुटुंबीय तीन दिवसांसाठी शिवाजी पेठेतील दिराच्या घरी राहण्यासाठी गेले होते.

रविवारी (दि. ३) त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांना बंगल्याचे कुलूप तोडून बाजूला टाकलेले दिसले. त्यांनी या प्रकाराची माहिती मायनेकर कुटुंबीयांना दिली. त्यांनी घरी येऊन पाहिले असता, चोरी झाल्याचे लक्षात आले.

जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मानसिंह खोचे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गेल्या चार दिवसांत देवकर पाणंद परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.
 

 

Web Title: Devkar is lodged in the village of Panand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.