महसूल कर्मचाºयांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 02:43 PM2017-10-04T14:43:43+5:302017-10-04T14:45:44+5:30

Demonstrations before the District Collector's Office of Revenue Personnel | महसूल कर्मचाºयांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

 महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्दे१० पासून ‘बेमुदत काम बंद’चा इशारापुरवठा विभागाचे कामकाज ठप्प

कोल्हापूर : जिल्ह्यातील महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, पुरवठा विभागातील सर्व कर्मचाºयांनी मंगळवारपासून कामकाज बेमुदत बंद केले असून, त्याची दखल न घेतल्यास दि. १० आॅक्टोबरपासून सर्व महसूल कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करतील, असाही इशारा यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आला.


पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवेने भरण्याबाबत शासनाने नुकतीच कार्यवाही केली आहे; त्यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाºयावर अन्याय होणार आहे; त्यामुळे या पद्धतीच्या भरतीच्या सूचनेला शासनाने स्थगिती द्यावी. याशिवाय महसूल कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. त्या अनुषंगाने २०१३ मध्येही शासनाच्या आश्वासनानंतर बेमुदत संप स्थगित करण्यात आला होता; पण गेल्या चार वर्षांत शासनाकडून कोणत्याही हालचाली न झाल्याने कर्मचाºयांत असंतोष पसरत आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

तसेच मंगळवारपासूनच जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या कर्मचाºयांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला प्रारंभ केला. शासनाने या मागण्या मान्य न केल्यास सर्व महसूल विभागातील कर्मचारी दि. १० आॅक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करतील, असाही इशारा जिल्हाधिकारी सुभेदार यांना शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिला.
या आंदोलनाचे नेतृत्व महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व सरचिटणीस विलासराव कुरणे यांनी केले. यावेळी आंदोलनात अध्यक्ष सुनील देसाई, विनायक लुगडे, प्रीती ढाले, अलका चव्हाण, विकास कोलते, प्रकाश पाटील, माणिक नागवेकर, आदी सहभागी झाले होते.


 

 

Web Title: Demonstrations before the District Collector's Office of Revenue Personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.