अमेरिकेतील गुन्हा मागे घेण्यासाठी सासऱ्याकडे ७२ लाखाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 02:47 PM2019-03-21T14:47:27+5:302019-03-21T14:50:35+5:30

अमेरिकेतील गुन्हा मागे घेण्यासाठी ७२ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी बुधवारी (दि. २०) रात्री कोल्हापूरातील जुना राजवाडा पोलिसात सुनेसह चौघांवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद सासरे सुर्यकांत पारिशनाथ शेटे (वय ६१, रा. ७२३ ए वॉर्ड, विद्याविहार कॉलनी, आयटीआयसमोर,कोल्हापूर) यांनी दिली.

Demand for 72 lacs in the US | अमेरिकेतील गुन्हा मागे घेण्यासाठी सासऱ्याकडे ७२ लाखाची मागणी

अमेरिकेतील गुन्हा मागे घेण्यासाठी सासऱ्याकडे ७२ लाखाची मागणी

Next
ठळक मुद्देअमेरिकेतील गुन्हा मागे घेण्यासाठी सासऱ्याकडे ७२ लाखाची मागणीसुनेसह चौघांवर कोल्हापूरात गुन्हा दाखल

कोल्हापूर : अमेरिकेतील गुन्हा मागे घेण्यासाठी ७२ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी बुधवारी (दि. २०) रात्री कोल्हापूरातील जुना राजवाडा पोलिसात सुनेसह चौघांवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद सासरे सुर्यकांत पारिशनाथ शेटे (वय ६१, रा. ७२३ ए वॉर्ड, विद्याविहार कॉलनी, आयटीआयसमोर,कोल्हापूर) यांनी दिली.

सुन जयश्री सलील शेटे , संदेश जगदेव, गायत्री अभय गाडेकर (तिघे रा. अ‍ॅटलांटा अमेरिका) व रघुनंदन प्रभाकर वणकुद्र्रे (रा. श्री मेटलस महाद्वार रोड, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नांवे आहेत. ही घटना तीन ते १४ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत घडली.


पोलिसांनी सांगितले की, सुर्यकांत शेटे यांचा मुलगा सलील याच्यावर अमेरिकेत गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी जयश्रीचे वडिल रघुनंदन वण्कुंद्रे यांनी सुर्यकांत शेटे व त्यांचा साडू पद्माकर बहिरशेट यांना ई-मेल आयडीवर भारतीय चलनातील ७२ लाख रुपये ( एक लाख अमेरिकन डॉलर) यांच्याकडे मागणी केली. हा प्रकार संशयितांनी संगनमताने केला असल्याचे सुर्यकांत शेटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव करीत आहेत.
 

 

Web Title: Demand for 72 lacs in the US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.