‘दत्त दालमिया’च्या कामगारांचा वनवास संपला : ‘त्या’ १३७ कामगारांच्या मागणीचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:28 AM2017-12-26T00:28:41+5:302017-12-26T00:30:49+5:30

पोर्ले तर्फ ठाणे : त्यांनी न्यायहक्कांसाठी कोणत्याही दबावाची तमा बाळगली नाही. ज्या-ज्या वेळी अन्याय झाला

'Datta Dalmiya' exhausted exile: 'Honor' of 137 workers demand | ‘दत्त दालमिया’च्या कामगारांचा वनवास संपला : ‘त्या’ १३७ कामगारांच्या मागणीचा सन्मान

‘दत्त दालमिया’च्या कामगारांचा वनवास संपला : ‘त्या’ १३७ कामगारांच्या मागणीचा सन्मान

googlenewsNext
ठळक मुद्दे२७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लढ्याला यश; नेमणूक पत्रे प्रदान दालमिया कंपनीचा सकारात्मक निर्णय व कामगारांच्या एकजुटीमुळे कामगारांचा जटील प्रश्न

सरदार चौगुले।
पोर्ले तर्फ ठाणे : त्यांनी न्यायहक्कांसाठी कोणत्याही दबावाची तमा बाळगली नाही. ज्या-ज्या वेळी अन्याय झाला, त्या-त्या वेळेस त्यांनी संघर्ष केला; पण धीर सोडला नाही. आज नाही तर उद्या आमचा हक्क आम्हाला नक्की मिळणार, या आशेतून मिळविला; पण थोडा उशीर का होईना? दालमिया कंपनीने ‘त्या’ १३७ कामगारांच्या मागणीचा सन्मान केलाच. ही व्यथा आहे, पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले-पोर्ले येथील दत्त साखर कारखान्यातील २७ वर्षे नेमणूक पत्राची प्रतीक्षा करणाºया रोजंदारी कामगारांची. प्रत्येकवेळी न्यायहक्कांसाठी बिरदेवाच्या माळावर संघर्षाची मशाल पेटविणाºया ‘त्या’ कामगारांसाठी हा सुवर्णक्षण होता.

‘दत्त’च्या कामगारांनी अनेक हंगाम यशस्वी केले. कामगारांच्या एकजुटीतील धोरणांत्मक निर्णयामुळे त्यांच्या जीवनात गोडवा निर्माण झाला. हा इथल्या कामगारांच्या एकीचा विजय आहे. कारखान्याच्या इतिहासात ज्या काही घडामोडी घडल्या, त्यात कामगारांची भूमिका निर्णायक ठरली आहे. म्हणूनच १३७ कामगारांना दालमिया कंपनीने नेमणूक पत्र देऊन जो सन्मान केला, ते एकीचेच फलित आहे. कारखान्यातील कुरघोडीच्या राजकारणामुळे २३ वर्षे सन्मानाची प्रतीक्षा करणाºया कामगारांना सन्मान मिळाला, तो दालमिया कंपनीने राजकारणाला मूठमाती दिल्यामुळेच. त्यामुळे कित्येक वर्षांच्या भिजत घोंगड्याला ‘दालमिया’च्या सकारात्मक निर्णयाची ऊब मिळाली.

कारखान्याच्या कामगारांनी अन्यायावेळी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अन्यायाला वाचा फोडली. अनेक संकटांशी सामना करीत कारखान्याच्या गळीत हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते; पण दत्तच्या कामगारांनी धीराने तोंड देत त्यावर मात केली. त्यामुळे कारखान्यावरील बिरदेवाच्या माळावर अफवांची कित्येक वादळे उठली तरी कारखान्याशी ऋणानुबंधाने जोडलेला कामगार कधीही डगमगला नाही.

१९८९ मध्ये वेज बोर्डाच्या संधीतून सुटलेल्या व नंतरच्या काळात सत्तेच्या कारभारात ठरावीक भरती झाली; परंतु त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह आधोरेखित होते. त्यानंतर नुसती आश्वासनं, उपासमारी व आर्थिक कोंडमाºयामुळे दिवाळखोरीसारखी नामुष्की पत्करावी लागली. २००६ मध्ये सहा वर्षांच्या भाडेतत्त्वाच्या दरम्यान रोजंदारी कामगारांची काही डाळ शिजलीच नाही.

५२०१२ मध्ये दालमिया कंपनीने कोटीची उड्डाणे घेत दत्त कारखाना खरेदी केला. त्यावेळी कामगार संघटनेशी झालेल्या करारानुसार २७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कामगारांच्या लढ्याला यश आले. उशीर का होईना; पण दालमिया कंपनीने त्या कामगारांना न्याय दिल्याने रोजंदारीने कामगाराच्या काळवंडलेल्या चेहºयावर साखरेची चकाकी आली. दालमिया कंपनीचा सकारात्मक निर्णय व कामगारांच्या एकजुटीमुळे कामगारांचा जटील प्रश्न सुटल्याने कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत कंपनीकडून कामगार नक्कीच आशावादी आहेत.

Web Title: 'Datta Dalmiya' exhausted exile: 'Honor' of 137 workers demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.