वाहनचालकांनो शिफारस केल्यास गुन्हा दाखल : अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:17 AM2019-05-31T11:17:59+5:302019-05-31T11:20:46+5:30

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांनो सावधान, आता आॅनलाईन ‘ई’ चलन मशीनद्वारे सक्तीने दंड भरून घेतला जाणार आहे. कोणाचाही वशिला चालणार नाही, शिफारस केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत.

Complaint filed if drivers recommend: Abhinav Deshmukh | वाहनचालकांनो शिफारस केल्यास गुन्हा दाखल : अभिनव देशमुख

वाहनचालकांनो शिफारस केल्यास गुन्हा दाखल : अभिनव देशमुख

googlenewsNext
ठळक मुद्देवाहनचालकांनो शिफारस केल्यास गुन्हा दाखल : अभिनव देशमुखसावधान, ‘ई’ चलनद्वारे दंडाची वसुली : अत्याधुनिक ५५ मशीन दाखल

कोल्हापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांनो सावधान, आता आॅनलाईन ‘ई’ चलन मशीनद्वारे सक्तीने दंड भरून घेतला जाणार आहे. कोणाचाही वशिला चालणार नाही, शिफारस केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत.

ए टी एम किंवा डेबिट कार्ड जागेवर स्क्रॅच करून दंड वसूल केला जाणार आहे; त्यासाठी पोलीस दलात ५५ अत्याधुनिक मशीन दाखल झाले आहेत. दंडाची पावती वाहनधारकाला जागेवर मिळणार आहे. बदलत्या काळानुसार ‘एक राज्य एक ई चालान’ या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी  दिली.

मुंबई, ठाणे, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये ‘ई’ चलन मशीनचा वापर पोलिसांकडून केला जात आहे. मोबाईलप्रमाणे दिसणाऱ्या ‘ई’ चलन मशीनचा लॉग इन आयडी व पासवर्ड ठरलेला आहे. यामध्ये कॅमेऱ्यांसह ‘ए टी एम व डेबिट कार्ड स्विप करण्याची सोय आहे. सिग्नलवर किंवा इतर ठिकाणी सेवा बजावताना एखादा वाहनचालक मोबाईलवर बोलत असणे, सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, एकेरी मार्ग असतानाही विरोधी दिशेने वाहन चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट अशा नियमबाह्य वाहनधारकांच्या संबंधित दुचाकी, कारचा फोटो वाहतूक पोलीस मशीनद्वारे काढतील. त्यानंतर त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे कलम टाकताच दंडाची रक्कम स्क्रीनवर दिसेल.

ही रक्कम वाहनधारकाने ए टी एम, डेबिट कार्ड वापरून आॅनलाईनद्वारे भरायची आहे. एखादा वाहनचालक दंड भरण्यास नकार देत राजकीय ओळख दाखवून शिफारस करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. एखाद्या व्यक्तीने देशभरात कितीवेळा वाहतुकीच्या नियमांचा भंग केला, याची कुंडली या मशीनमध्ये पाहायला मिळणार आहे.

एखाद्या वाहनधारकास दंड भरण्यास पुरेसे पैसे नसतील, तर नंतर तो घरी जाऊन राज्यात कोठूनही आॅनलाईनद्वारे दंड भरूशकतो, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल गुजर उपस्थित होते.

यांना दिली मशीन

  1. शहर वाहतूक शाखा : ३०
  2. इचलकरंजी वाहतूक शाखा : १०
  3. जुना राजवाडा पोलीस ठाणे : १
  4. लक्ष्मीपुरी : १
  5. राजारामपुरी : १
  6. शाहूपुरी : १
  7. गांधीनगर : २
  8. एमआयडीसी : २
  9. गोकुळ शिरगाव : १
  10. करवीर : २
  11. जयसिंगपूर : २
  12. वडगाव : २

 

 

Web Title: Complaint filed if drivers recommend: Abhinav Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.