"अडीच वर्षांच्या वनवासानंतर आपलं सरकार आलं; नवं काही उभं करण्यासाठी पुढं या, पाठबळ देऊ"

By समीर देशपांडे | Published: August 13, 2022 05:15 PM2022-08-13T17:15:21+5:302022-08-13T17:15:56+5:30

रोज गळ्यात मफलर घालून कार्यक्रम करत फिरणे म्हणजे काम नव्हे.

Come forward to build something new for the development of Kolhapur district. Will definitely support, Testimony of new minister Chandrakant Patil | "अडीच वर्षांच्या वनवासानंतर आपलं सरकार आलं; नवं काही उभं करण्यासाठी पुढं या, पाठबळ देऊ"

"अडीच वर्षांच्या वनवासानंतर आपलं सरकार आलं; नवं काही उभं करण्यासाठी पुढं या, पाठबळ देऊ"

Next

कोल्हापूर : अडीच वर्षांच्या वनवासानंतर आपलं सरकार आलं आहे. वेळ कमी आहे. परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी, नवं काही उभं करण्यासाठी पुढं या. निश्चित पाठबळ देवू अशी ग्वाही नूतन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पाटील पहिल्यांदा आज, शनिवारी कोल्हापुरात आले. यानिमित्ताने कसबा बावडा येथील अलंकार हॉलवर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. पाटील म्हणाले, विकासाची कामे वाढवण्यासाठी यंत्रणाही वाढवणार आहोत. स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिकांसाठी काम करण्यासाठी पुढे या. आपलं सरकार धडाधड निर्णय घेत आहे. नसीमा हुरजुक, कांचनताई परूळेकर या वयातही काम करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी झपाटून काम करण्याची गरज आहे. रोज गळ्यात मफलर घालून कार्यक्रम करत फिरणे म्हणजे काम नव्हे, तर आपण नवं काही उभं केलं पाहिजे. यामध्ये ‘सबका साथ, सबका विकास’ सूत्र हवे.

यावेळी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते सुरूवातीलाच पाटील यांचा सत्कार करण्यता आला. यानंतर खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, नसीमा हुरजुक, अरूण इंगवले, राहूल चिकोडे, सत्यजित कदम, अशोक चराटी, महेश जाधव, भगवान काटे, विजय भोजे, राहूल देसाई, विजय जाधव, अशोक देसाई, सचिन बल्लाळ, उदयकुमार देशपांडे, महेश चौगुले, सुधीर कुंभार, सुनील कदम, अभयकुमार साळुंखे, क्रांतीकुमार पाटील, डी. आर. मोरे, राजाराम शिपुगडे, सुहास लटोरे, नाथाजी पाटील, अल्केश कांदळकर, विजय खाडे, प्रविण सावंत, बाबा इंदूलकर, डॉ. संजय पाटील, माणिक पाटील चुयेकर, अजित ठाणेकर, अनिरूध्द कोल्हापुरे, नंदकुमार वळंजू, हंबीरराव पाटील, समीर नदाफ, सचिन तोडकर नजीर देसाई गायत्री राऊत, सौम्या तिरोडकर, मीलन होळणकर याच्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि बाराही तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

आज एन. डी. हवे होते

पाटील म्हणाले, आमच्या सरकारने उपसा जलसिंचन योजनांच्या वीजबिलामध्ये ३४७ कोटी रुपयांची सूट दिली. आज एन. डी. पाटील जिवंत असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. आता जुन्या बाकीचा विषय आहे. त्याबाबतही निर्णय होईल.

Web Title: Come forward to build something new for the development of Kolhapur district. Will definitely support, Testimony of new minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.