जयघोषाच्या अखंड गजरात रंगला शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा

By Admin | Published: June 6, 2017 03:48 PM2017-06-06T15:48:38+5:302017-06-06T15:48:38+5:30

राज्यातील १४ विद्यापीठाच्या एनएसएस स्वयंसेवकांची उपस्थित्ती; ढोलताशांच्या निनादाने शिवाजी विद्यापीठात चैतन्य

Celebration of Shivrajyabhishek's Day in the uninterrupted Gajr | जयघोषाच्या अखंड गजरात रंगला शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा

जयघोषाच्या अखंड गजरात रंगला शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0६ : छत्रपती शिवरायांच्या जयघोषाचा अखंंड गजर आणि ढोल ताशांच्या निनादात शिवाजी विद्यापीठात मंगळवारी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. विद्यापीठात सुरू असलेल्या ‘आव्हान’ शिबीरातील सहभागी १४ विद्यापीठांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) सुमारे १२०० शिबीरार्थी स्वयंसेवकांनी परिसरात चैतन्य निर्माण केले. त्यांच्या उत्साहाने विद्यापीठातील सकाळचे वातावरण शिवमय बनले.

‘आव्हान’ मधील स्वयंसेवकांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती जमून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाचा अखंड गजर आणि ढोलताशांचा निनाद यांच्या तालावर विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनाची सकाळ शिवमय बनविली. शिवराय यांच्या जयघोषाचा गजर करताना शिबिरार्थींचा उत्साह ओसंडून वाहात होता. त्यांनी या कार्यक्रमात चैतन्यदायी वातावरणाचा रंग भरला. यावेळी एनएसएसचे स्वयंसेवक अक्षय चव्हाण, तेजस घुलघुले यांनी केलेल्या शिवगजर्नेने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभारले.

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या जोसेस वढाई याने प्रेरणादायी शिवगीत सादर केले. उत्साहात सर्व मान्यवर ढोलताशाच्या गजरात विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात जमले. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या संबोधनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, एनएसएसचे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, डॉ. पी.डी. राऊत, ए.एम. गुरव, एनडीआरएफचे निरीक्षक एस.डी. इंगळे, नागरबाई शिंदे, अनिता शिंदे, डॉ. डी. आर. मोरे, आदी उपस्थित होते.

शिबिरार्थींकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन

शिबिरार्थींनी अत्यंत अनोख्या पद्धतीने शिवरायांना अभिवादन केले. राज्याच्या १४ विद्यापीठांतून आलेल्या या विद्यार्थ्यांची पन्हाळा, भिवगड, कन्हेरगड, रायगड आणि देवगिरी पाच गटांत विभागणी केली आहे. त्यांना अनुक्रमे भगवा, पांढरा, हिरवा, आकाशी आणि गडद निळा असे पाच रंगांचे गणवेश देण्यात आले होते. यापैकी पांढऱ्या गणवेशातील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पुतळ्याभोवती गोल कडे केले आणि इतर संघांनी पुतळ्याच्या बागेभोवती गोल कडे करीत रंगीबेरंगी स्वस्तिक साकारले.

शिवराय हे ज्ञानाचे प्रतिक

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शौर्याचेच नव्हे, तर ज्ञानाचेही प्रतीक आहेत. म्हणूनच आज जगभर त्यांच्या युद्धनितीचा आणि कुशल व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास केला जातो, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी येथे केले. विद्यापीठात सकाळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित विशेष समारंभात त्यांनी मार्गदर्शन केले. शिवाजी विद्यापीठात मंगळवारी शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला. यात ‘आव्हान’ शिबीराद्वारे राज्यातील १४ विद्यापीठातील एनएसएसच्या सुमारे १२०० स्वयंसेवकांनी सहभागी होऊन चैतन्य निर्माण केले. शिवाजी विद्यापीठात मंगळवारी शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला. यात ‘आव्हान’ शिबीराद्वारे राज्यातील १४ विद्यापीठामधील एनएसएसचे सुमारे १२०० स्वयंसेवक सहभागी झाले. या सोहळ्यावेळीचे हे विहंगम दृश्य.

Web Title: Celebration of Shivrajyabhishek's Day in the uninterrupted Gajr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.