सी.ए. परीक्षेत कोल्हापुरातील १७ जणांचे यश ४६ विद्याथी उत्तीर्ण : संकेतस्थळावर निकाल; दोन्ही ग्रुपमध्ये दोन विद्यार्थी यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:09 AM2018-01-18T01:09:50+5:302018-01-18T01:09:59+5:30

कोल्हापूर : नवी दिल्ली येथील आॅल इंडिया चार्टंड अकौंटंट इन्स्टिट्यूटतर्फे नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या सी.ए. परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर

 C.A. 17 students of Kolhapur, 46 students passed in exam: Result on website; Two students succeeded in both groups | सी.ए. परीक्षेत कोल्हापुरातील १७ जणांचे यश ४६ विद्याथी उत्तीर्ण : संकेतस्थळावर निकाल; दोन्ही ग्रुपमध्ये दोन विद्यार्थी यशस्वी

सी.ए. परीक्षेत कोल्हापुरातील १७ जणांचे यश ४६ विद्याथी उत्तीर्ण : संकेतस्थळावर निकाल; दोन्ही ग्रुपमध्ये दोन विद्यार्थी यशस्वी

Next

झाला. या परीक्षेत कोल्हापूर विभागातील ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर १७ विद्यार्थ्यांना सी.ए. ही पदवी मिळाली, अशी माहिती कोल्हापूर विभागाचे उपाध्यक्ष नवीन महाजन यांनी दिली.
सीए परीक्षेसाठी पहिल्या व दुसºया गु्रपमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी इन्स्टिट्यूटच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन्ही गु्रप उत्तीर्ण होणाºयांमध्ये दोघांचा समावेश आहे.
श्रावणी मेहता व पुनित कोठारी यांनी पहिल्या प्रयत्नांत दोन्ही ग्रुपमध्ये उत्तीर्ण होण्यात यश मिळविले असून त्यांना सीए ही पदवी मिळाली आहे. या दोघांसह तन्मयी देशिंगकर, निनाद पागनीस, सावन उभीरानी, प्रदीप पाटणकर, स्वप्निल भटमारे, निशांत पाटील, सुप्रिया पोवार, शुभम गद्रे, ऋतुजा हजारे, केदार माने, ऋजुता नरके, मृण्ययी कुलकर्णी, ओंकार पोतदार, आशिष मोरती, प्रतीक कुलकर्णी यांना सीए पदवी प्राप्त झाली आहे.
पहिल्या व दुसºया गु्रपमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वरूप शहा, धनंजय गानू, अजय मलानी, अभिजित निरूखे, अभिषेक पाटील, वैष्णवी संकपाळ, अक्षय लोणकर, मोनिका छाबडिया, दीप्ती पाटील, स्वप्निल राजहंस, पल्लवी पुराणिक, श्रद्धा वाठारकर, तृप्ती जोशी, प्रणव परुळेकर, करण गवस, सचिन पाटील, ओंकार चरापले, नम्रता कस्तुरे, आकाश गवळी, चिन्मयी कुलकर्णी, मन्मथ ठाकूर, रवीकुमार लखोटिया, अमोल देशपांडे, सुश्रृत कुलकर्णी, दीपाली देव, अर्पिता डोर्ले, शुभम हरगुडे, निरंजन शिंदे, राजेंद्र प्रभू यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

Web Title:  C.A. 17 students of Kolhapur, 46 students passed in exam: Result on website; Two students succeeded in both groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.