भोगावती परिसर, हुपरीत चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:07 AM2017-10-23T01:07:42+5:302017-10-23T01:07:42+5:30

Bhogawati campus, thunderbolt | भोगावती परिसर, हुपरीत चोरट्यांचा धुमाकूळ

भोगावती परिसर, हुपरीत चोरट्यांचा धुमाकूळ

Next



‘भोगावती’मधून अडीच लाखांचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
भोगावती : भोगावती, कौलव येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी विविध दूध संस्था आणि दुकानांना लक्ष्य करीत तब्बल अडीच लाखांवर ऐवज लंपास केला. भोगावती (ता. करवीर) येथील लुक्स गारमेंट या दुकानातील रोकडसह एक लाखाचा ऐवज लंपास केला. अभिषेक इलेक्ट्रॉनिकमधील सतरा हजार $रुपयांसह तीन एलईडी असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी अन्य दोन दुकान फोडली. मात्र, काही मिळाले नाही, तर कौलव (ता. राधानगरी) येथे विठ्ठाई दूध संस्था, पिठाची चक्की व भोगावती येथील अजित चरापले यांच्या टायरचे दुकान, शिवशक्ती वॉच कंपनी ही दुकाने फोडली.
हळदी, वाशीत चोºया
सडोली (खालसा) : वाशी व हळदी (ता. करवीर) येथील बेकरीमालाचे व होलसेल किराणा माल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी बिस्कीट बॉक्स व इतर २७ हजारांच्या मालासह सुमारे वीस हजार रुपये लंपास केले. ही चोरी शनिवारी रात्री झाली असून, याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.
अधिक माहिती अशी की, वाशी (ता. करवीर) येथील खंडेराव दिनकर कांबळे यांचे नंदवाळ फाटा येथे बेकरीमालाचे दुकान असून, शनिवारी भाऊबीज असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू होते. विक्री झालेले पाच हजार ड्रॉव्हरमध्ये ठेऊन त्यांनी रात्री दुकान बंद केले. रविवारी सकाळी एका कामगाराला दुकानाचे दार उचकटल्याचे लक्षात आले. त्याने लगेच कांबळे यांना घरी जाऊन हा प्रकार सांगितला. पाहणी करताना हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्याने या बेकरीमाल दुकानामधील महागडे बिस्कीट पुडे, आइस्क्रीम असा सात हजार रुपयांचा माल व पाच हजार रुपये लंपास केले.
हळदी येथील राजू बाबूराव तेली यांच्या होलसेल किराणा मालाच्या दुकानाचे शटर उचकटून व कुलूप तोडून चोरट्याने काजू बिया, बदाम, वेलदोडे, बेदाणे असा वीस हजार रुपयांच्या मालासह दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली. या दोन्हीही चोरीची नोंद करवीर पोलिसांत झाली असून, अधिक तपास करवीर पोलीस करीत आहेत.
आणाजे, सिरसे येथे दूध संस्था फोडल्या
आमजाई व्हरवडे : आणाजे, सिरसे (ता. राधानगरी) परिसरात चोरट्यांनी शनिवारी रात्री येथील दोन दूध संस्था व सिरसे येथील दूध संस्थेत डल्ला मारला. चोरट्यांनी रोख २५ हजार रुपये लंपास केले.
आणाजे येथील इवराई सहकारी दूध संस्थेत चोरट्यांनी प्रवेश करून तिजोरीचे लॉक तोडून रोख २५ हजार पळविले. साहित्यांची मोडतोड करून साहित्य विस्कटले. त्यानंतर चोरट्यांनी येथील कामधेनू दूध संस्थेकडे मोर्चा वळविला. येथे तिजोरीचे लॉक तोडत असतानाच शेजारी मंदिरात झोपलेले ग्रामस्थ जागे झाले. ते बाहेर येताच चोरट्यांनी पळ काढला. सिरसे येथील मुख्य रस्त्यावर असणाºया शरदचंद्र सहकारी दूध संस्थेत तिजोरीचे लॉक तोडून चोरट्यांनी साहित्यांची मोडतोड करून साहित्य विस्कटले. या तिजोरीत काहीच मिळाले नाही. रविवारी सकाळी सात वाजता कर्मचारी दूध संकलनासाठी आले असता चोरीचा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
आकनूर परिसरात १२ संस्थांसह घर फोडले
सरवडे/ सोळांकुर : राधानगरी तालुक्यातील आकनूर, सुळंबी, मांगेवाडी या गावांत चोरट्यांनी संस्था व बंद घरांना लक्ष्य केले. मात्र, दूध संस्थांनी दिवाळीपूर्वीच बोनस व रिबेट वाटप केल्याने चोरट्यांच्या हाती मोठी रक्कम लागली नाही.
आकनूरमधील घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे. चोरट्यांनी रविवारी रात्री मांगेवाडीतील रामलिंग दूध संस्था, सुळंबीतील श्रीराम दूध संस्था, आकनुरातील चाळकेश्वर दूध संस्था व हनुमान रेशनिंग दुकान, सेवा संस्थेचे गोडावून, आदी ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर मांगेवाडी रस्त्यावरील शिक्षक गणेश रंगराव चव्हाण यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून ५० ते ६० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. आरोग्य विभागाचे कर्मचारी अनिता पाटील-माने व विक्रम पेडणेकर यांच्या घरी चोरीच प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात भीती पसरली आहे.
पाच महिन्यांपूर्वीच्या चोºयांचा तपास नाहीच
या परिसरात गेल्या पाच पाच महिन्यांपूर्वी चोरट्यांनी असाच धुमाकूळ घालत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्यावेळीही चोरट्यांनी दुकान, दूध संस्थांनाच लक्ष्य केले होते. हे चोरटे अद्यापही पोलिसांच्या हाताला लागले नाही. तोपर भाऊबीज संपताच चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर या परिसरात पोलिसांनी रात्री गस्त सुरू करावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

Web Title: Bhogawati campus, thunderbolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.