सूर्याकडे एकटक पाहण्याचा बेळगावात विश्वविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:15 PM2019-01-20T23:15:58+5:302019-01-20T23:16:03+5:30

बेळगाव : बेळगाव येथील प्रदीप सासणे यांनी रविवारी सूर्याकडे एकटक पाहण्याचा विश्वविक्रम केला. लेले मैदानावर त्यांनी सूर्याकडे एकटक लावून ...

Belgaum World Record to look at the sun | सूर्याकडे एकटक पाहण्याचा बेळगावात विश्वविक्रम

सूर्याकडे एकटक पाहण्याचा बेळगावात विश्वविक्रम

Next

बेळगाव : बेळगाव येथील प्रदीप सासणे यांनी रविवारी सूर्याकडे एकटक पाहण्याचा विश्वविक्रम केला. लेले मैदानावर त्यांनी सूर्याकडे एकटक लावून सलग दहा मिनिटे पाहण्याचा विक्रम केला. सासणे यांनी या कामगिरीने जन्मभूमी निपाणी आणि कर्मभूमी बेळगाव शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.
तेजस्वी सूर्याकडे दोन क्षण पाहणे कठीण असते अशा सूर्याकडे सलग दहा मिनिटे सासणे हे पाहत राहिले आणि टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. सासणे यांच्या विक्रमाची नोंद करण्यासाठी वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्ड संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष शुक्ला व सांस्कृतिक मंत्रालयाचे सदस्य भारत शर्मा उपस्थित होते. वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डस् ही जागतिक मान्यताप्राप्त संस्था असून वेगवेगळ्या विक्रमांच्या नोंदीसाठी पडताळणी करते. रविवार सकाळपासूनच प्रदीप सासणे यांच्या विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्यामुळे लेले मैदान गर्दीने फुलून गेले होते. महापौर बसाप्पा चिक्कलदिनी, उपमहापौर मधुश्री पुजारी, आदींच्या हस्ते सासणे यांना विक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

Web Title: Belgaum World Record to look at the sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.