दानशूर बनले ‘त्यांचा’ आनंद

By admin | Published: November 23, 2014 11:21 PM2014-11-23T23:21:56+5:302014-11-23T23:59:08+5:30

कुष्ठधाम रुग्णालय : शेट्ये दाम्पत्य झाले कुष्ठरुग्णांचे गणगोत

Become a charitable 'their' joy | दानशूर बनले ‘त्यांचा’ आनंद

दानशूर बनले ‘त्यांचा’ आनंद

Next

कोल्हापूर : घरच्यांनी बाहेर काढले. सरकारने सांभाळण्यात हेळसांड सुरू केल्यामुळे शारीरिक वेदनांबरोबरच आता मनानेही खचत चाललेल्या कुष्ठरोग पीडित बांधवांना समाजातील काही मोजके दानशूर हेच आपला आधार वाटत आहेत. काही दानशूर काम कमी आणि प्रसिद्धी जादा मिळविण्याचा प्रयत्न करतात; पण काहीजण सातत्याने या कुष्ठरोग पीडितांसोबत असतात. त्यांना सर्व प्रकारची मदत करीत असतात.
मध्यंतरी एका संघटनेने कुष्ठधाम रुग्णालयातील सर्व रुग्णांना दररोज भोजन देण्याची घोषणा केली; पण चार-सहा दिवसांनंतर हा उपक्रम बंद पडला; मात्र त्यांना प्रसिद्धी भरपूर मिळाली. त्यांचा हेतू (प्रसिद्धीचा) साध्य झाल्यावर पुन्हा कधी त्यांनी या ‘कुष्ठधाम’कडे पाहिले नाही. अधूनमधून काही संघटना असाच प्रयोग करीत असतात; परंतु त्यात प्रामाणिकपणा कमी आणि दिखावा अधिक असतो. मनात एक वेगळी भावना निर्माण झालेली असते; पण काहीच चालत नाही. सारे काही निमूटपणे सहन करावे लागते.
शेंडापार्कमधील कुष्ठरोग पीडित बांधवांना नगरसेवक भूपाल शेटे व त्यांच्या पत्नी शशिकला शेटे हे दाम्पत्य मात्र सतत उपयोगी पडत असते. शेटे आणि कुष्ठरोग पीडित बांधव यांचे नाते एवढे घट्ट विनले गेले आहे. ज्यांनी कोणी आपल्या दारात उभे करून घेत नाहीत तेथे शेटे यांच्या घरात थेट किचनपर्यंत सहज प्रवेश मिळतो. घरात येणाऱ्या कुष्ठरोग पीडितांना भोजन, चहा दिला जातो. कोणत्याही अडचणी हक्काने सांगितल्या जातात. शेटे दाम्पत्यही त्या सोडविण्यास मदत करतात. नवे कपडे, चादरी, औषधे सतत देत असतात.
या कुष्ठरोग पीडितांबद्दल शनिवारपासून सलग दोन दिवस ‘लोकमत’मध्ये वृत्त छापून आले, तेव्हा त्यांनी शेंडापार्कमध्ये जाऊन विचारपूस केली. त्यांनी सर्व खोल्यांत तातडीने नवीन बल्ब आणून बसविले. डासांपासून संरक्षण करण्यासाठी गूडनाईटची पंधरा कीट खोल्यांतून बसविली. मनपाची यंत्रणा
राबवून फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी केली. कुष्ठरोग पीडितांना तातडीने पायात घालण्यास सॅँडलचे ३६ जोड आणून दिले. त्यांनी ते पायातही घातले. शेटे दाम्पत्य वेळोवेळी या बांधवांना अन्नदान करीत असतात. कोणताही सण असो त्यांना
गोडधोड पदार्थ खायला देतात;
पण त्याची कोठेही
प्रसिद्धी अथवा समारंभ केला नाही. (प्रतिनिधी)

विशेष अतिथीचा मान कुष्ठपीडितांना...!
कोणत्याही शुभकार्यासाठी बहुतांश लोक मोठ-मोठ्या व नामांकित व्यक्तींना निमंत्रित करुन बडेजाव करतात. मात्र, याला भूपाल शेटे अपवाद ठरले आहेत. दानशूरपणाबद्दल त्यांचे नाव आदराने घेतले जाते. सुभाषनगर चौकातील टोलेजंग इमारतीचा पायाभरणी समारंभ शेटे यांनी कुष्ठपीडितांच्या हस्ते नऊ वर्षांपूर्वी मोठ्या दिमाखात केला होता. शिवाय त्यानंतर याच इमारतीच्या वास्तुशांतीसाठी स्वाधारनगर व कुष्ठधाम रुग्णालयातील कुष्ठपीडितांना विशेष अतिथी म्हणून शेटे यांनी निमंत्रित केले होते.

Web Title: Become a charitable 'their' joy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.