मुंबई अन् गुजरातमधील पर्यटकांच्या कारला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 03:12 PM2018-11-16T15:12:58+5:302018-11-16T15:22:31+5:30

बोंडारवाडी, ता. महाबळेश्वर गावच्या हद्दीत दोन कारच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत पाचजण गंभीर जखमी झाले असून, जखमींना उपचारार्थ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये मुंबई अणि गुजरातमधील पर्यटकांचा समावेश आहे. हा अपघात गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास झाला.

Accidents of tourists car in Mumbai and Gujarat | मुंबई अन् गुजरातमधील पर्यटकांच्या कारला अपघात

मुंबई अन् गुजरातमधील पर्यटकांच्या कारला अपघात

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई अन् गुजरातमधील पर्यटकांच्या कारला अपघातपाचगणीजवळील दुर्घटना : पाचजण जखमी

पाचगणी : बोंडारवाडी, ता. महाबळेश्वर गावच्या हद्दीत दोन कारच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत पाचजण गंभीर जखमी झाले असून, जखमींना उपचारार्थ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये मुंबई अणि गुजरातमधील पर्यटकांचा समावेश आहे. हा अपघात गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथील काही पर्यटक कारने पाचगणीवरून महाबळेश्वरला जात होते. तर गुजरातमधील पर्यटक कारने महाबळेश्वरवरून पाचगणीकडे निघाले होते. यावेळी या दोन्ही कारची पाचगणीजवळील बोंडारवाडी येथे समोरासमोर धडक झाली.

या अपघातात दोन्ही कारमधील पाचजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर सर्व जखमींना काही नागरिकांनी तसेच पोलिसांनी तत्काळ खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. त्यामुळे जखमींची नावे अद्याप पोलिसांना समजली नाहीत.

Web Title: Accidents of tourists car in Mumbai and Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.