Kolhapur: ..अखेर न्यूटन एंटरप्रायजेसच्या अजिंक्य पाटीलवर गुन्हा; बनावट परवान्याने सीपीआरला सर्जिकल साहित्य पुरवठा

By विश्वास पाटील | Published: March 25, 2024 12:30 PM2024-03-25T12:30:20+5:302024-03-25T12:30:49+5:30

'सीपीआरला बनावट परवान्याने औषध पुरवठा' असे सर्वात प्रथम या फसवणूकीचे वृत्त देवून या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.

A case of fraud against Ajinkya Anil Patil owner of Newton Enterprises, who supplied surgical materials to CPR through fake licences | Kolhapur: ..अखेर न्यूटन एंटरप्रायजेसच्या अजिंक्य पाटीलवर गुन्हा; बनावट परवान्याने सीपीआरला सर्जिकल साहित्य पुरवठा

Kolhapur: ..अखेर न्यूटन एंटरप्रायजेसच्या अजिंक्य पाटीलवर गुन्हा; बनावट परवान्याने सीपीआरला सर्जिकल साहित्य पुरवठा

कोल्हापूर : बनावट परवान्याद्वारे सीपीआरला सर्जिकल साहित्याचा पुरवठा करणाऱ्या न्यूटन एंटरप्रायजेस या कंपनीचे मालक अजिंक्य अनिल पाटील (रा.राम गल्ली, त्रिमुर्ती कॉलनी कळंबा कोल्हापूर) शनिवारी (दि.२३) रात्री अकरा वाजता अखेर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला. लोकमतने १ फेब्रुवारी २०२४ ला सीपीआरला बनावट परवान्याने औषध पुरवठा असे सर्वात प्रथम या फसवणूकीचे वृत्त देवून या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.

यासंदर्भातील फिर्याद अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मनोज अय्या यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत दिली. त्याचा गुन्हा रजिस्टर क्रमांक १४८- २०२४ असून भांदविस कलम ४०९ (सरकारी यंत्रणेची फसवणूक), ४२० (फसवणूक), ४६५(बनावट कागदपत्रे तयार करणे), ४६८ (तोतयेगिरी) आणि ४७१ (तोतयेगिरी करून फसवणूक) या कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

अजिंक्य पाटील याने हेदवडे (ता.भुदरगड) येथील शरद पांडुरंग वैराट यांच्या नावे मंजूर असलेल्या मे शौर्य मेडिकल ॲन्ड डिस्ट्रीब्यूटर्सच्या नावे असलेला मूळ परवानाच्या इंटीमेशन लेटरच्या नाव व पत्यामध्ये खोटारडेपणाने बदल केला. अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचा बनावट व खोटा शिक्का तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त अश्विन केशवराव ठाकरे यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने मे. न्यूटन एंटरप्रायजेस कोल्हापूर या दूकानाचे खोटे व बनावट इंटीमेशन लेटर तयार करून ते खरे आहे असे भासवून त्याद्वारे सीपीआर जिल्हा रुग्णालयास औषधे व सर्जिकल साहित्य पुरवठा करण्याची निविदा मंजूर करून त्याद्वारे तब्बल ५ कोटी १७ लाख ६३ हजार ४४० रुपयांचे सर्जिकल साहित्याचा पुठवठा केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जयराज कोळी यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा केला. स्वत: शरद वैराट यांनी भुदरगड, लक्ष्मीपुरी आणि पोलिस अधिक्षकांच्याकडे लेखी तक्रार देवूनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती.

अजिंक्य पाटीलवर कणकवलीसह दोन पोलिस ठाण्यात गुन्हे..

संशयित आरोपी अजिंक्य पाटील याच्यावर यापूर्वी दोन पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसांत त्याच्यावर सीआरपीसी ४५१,४५७ तसेच भांदविस ४९८ अ, ४५२,४२७,३२३,५०४,५०६,३४य२१ प्रमाणे तर कणकवली पोलिस ठाण्यात भांदविस २७९, ३३७, मोवाकाक १८४, १८४, सी, १९२ अ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: A case of fraud against Ajinkya Anil Patil owner of Newton Enterprises, who supplied surgical materials to CPR through fake licences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.