‘हुपरी’साठी चुरशीने ८५ टक्के मतदान,किरकोळ बाचाबाचीचे प्रकार : १०० उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:59 AM2017-12-14T00:59:34+5:302017-12-14T01:00:46+5:30

हुपरी : नवनिर्मित हुपरी (ता. हातकणंगले) नगरपरिषदेच्या बुधवारी पार पडलेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बाचाबाचीच्या किरकोळ घटना वगळता

 85 percent polling for 'Hupari', minor misconduct: 100 candidates in the fray | ‘हुपरी’साठी चुरशीने ८५ टक्के मतदान,किरकोळ बाचाबाचीचे प्रकार : १०० उमेदवार रिंगणात

‘हुपरी’साठी चुरशीने ८५ टक्के मतदान,किरकोळ बाचाबाचीचे प्रकार : १०० उमेदवार रिंगणात

Next
ठळक मुद्देआज दुपारपर्यंत होणार निकाल स्पष्टआघाडीच्या नेत्यांची व उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

हुपरी : नवनिर्मित हुपरी (ता. हातकणंगले) नगरपरिषदेच्या बुधवारी पार पडलेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बाचाबाचीच्या किरकोळ घटना वगळता प्रचंड ईष्येर्ने, पण शांततामय व उत्साही वातावरणात ८५.३७ टक्के मतदान झाले. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेले नगराध्यक्षपद व ९ प्रभागांतील १८ नगरसेवकपदांसाठी नशीब आजमावत असलेल्या १०० उमेदवारांच्या नशिबाचा बुधवारी मतदारांनी मतदानरूपी केलेला फैसला आज, गुरुवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक होत असल्याने या निकालाकडे रौप्यनगरीवासीयां-बरोबरच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.
या निवडणुकीत भाजप, कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी, शिवसेना व मनसे प्रणीत अंबाबाई विकास आघाडीच्या नेत्यांची व उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी सात वाजल्यापासून ९ प्रभागांतील ११ ठिकाणी २७ मतदान केंद्रांवर चुरशीने, पण शांततेने मतदान सुरू झाले. शहरात पुरुष मतदार ११२४४ व महिला मतदार १०५२६ असे मिळून २१७७० मतदार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ८५.१८ टक्के मतदान झाले. २१७७० मतदारांपैकी ९७३० पुरुष व ८८१३ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दुपारी सर्वच नऊ प्रभागांतील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेबाबतची माहिती जाणून घेतली. नगराध्यक्षपदासाठी जयश्री महावीर गाट (भाजप), सीमा प्रकाश जाधव (कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी), गीतांजली दौलतराव पाटील (मनसे प्रणीत अंबाबाई विकास आघाडी), विमल मुरलीधर जाधव (शिवसेना) व दीपाली बाळासाहेब शिंदे (अपक्ष-राष्ट्रवादी पुरस्कृत) या प्रमुख उमेदवारांत पंचरंगी चुरशीची रंगतदार लढत होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, माजी मंत्री प्रकाश आवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, आमदार सुजित मिणचेकर, मनसेचे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

उमेदवारांत वादावादी; अपघातात शेंडुरे जखमी
नगरपरिषद कार्यालयासमोरील कन्या विद्यामंदिर शाळेतील मतदान केंद्राजवळ चारचाकी गाडी घेऊन जाण्याच्या कारणावरून प्रभाग क्रमांक तीनमधील भाजपचे उमेदवार आण्णासाहेब शेंडुरे व शिवसेनेचे उमेदवार संभाजी हांडे यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची व वादावादी झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्य स्मिता शेंडुरे यांचे पती वीरकुमार यांच्या पायावरून चाक गेल्याने ते जखमी झाले. तसेच गाडी पाठीमागे घे, नाहीतर गाडीच फोडतो, असे म्हणत हांडे यांनी दगड हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Web Title:  85 percent polling for 'Hupari', minor misconduct: 100 candidates in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.