‘इंडिया पेमेंट’चे अडीच महिन्यांत २७७२ खातेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:05 AM2018-11-18T01:05:49+5:302018-11-18T01:07:16+5:30

गणेश शिंदे । कोल्हापूर : बँकिंग सुविधांपासून वंचित आणि अपूर्ण बँकिंग सुविधा असणाºया लोकांपर्यंत सर्व प्रकारच्या बॅँकिंग सुविधा पोहोचविणे ...

2,727 account holders in the second month of 'India Payments' | ‘इंडिया पेमेंट’चे अडीच महिन्यांत २७७२ खातेदार

‘इंडिया पेमेंट’चे अडीच महिन्यांत २७७२ खातेदार

Next
ठळक मुद्देगोवा परिक्षेत्रात कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर ग्रामीण भागातील लोकांना अतिशय फायदेशीर

गणेश शिंदे ।
कोल्हापूर : बँकिंग सुविधांपासून वंचित आणि अपूर्ण बँकिंग सुविधा असणाºया लोकांपर्यंत सर्व प्रकारच्या बॅँकिंग सुविधा पोहोचविणे हा उद्देश व ‘आपली बँक आपल्या दारी’ हे ब्रीद घेऊन भारतीय डाक विभागाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’चे (आयपीपीबी) गेल्या अडीच महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्णात २७७२ खातेदार झाला आहेत.

गोवा परिक्षेत्रात कोल्हापूर शाखेचा ‘आयपीपीबी’मध्ये दुसरा क्रमांक लागतो. सध्या जिल्ह्यात पाच ठिकाणी ही सेवाकेंद्रे सुरू आहेत. जिल्ह्णात एकूण ५६३ सेवाकेंद्रे होणार आहेत. त्यांतील उर्वरित ५५१ सेवाकेंद्रे ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत सुरू करण्यात येणार आहेत. याचा लाभ विशेषत: ग्रामीण भागातील लोकांना होणार आहे.

देशातील तीन लाखांपेक्षा अधिक पोस्टमन ग्रामीण, शहरी आणि दुर्गम भागांत अगदी दारावर जाऊन ‘आयपीपीबी’ ही सुविधा पोहोचविण्यास मदत करणार आहेत. एक सप्टेंबर २०१८ रोजी ‘आयपीपीबी’ची ६५० शाखा व ३२५० सेवाकेंद्रे सुरू झाली. देशभरात एक लाख ५५ हजार सेवाकेंद्रे ३१ डिसेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्णात डाकघराच्या (पोस्ट) ६५० शाखा आहेत. गॅस अनुदान, विद्यार्थी शिष्यवृत्ती, प्रधानमंत्री मातृत्व योजना, प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना, मनरेगा, धान्य वितरण पुरवठा, आदी सरकारच्या सेवांना आयपीपीबी सुविधा उपयोगी पडणार आहे. या सुविधेचा लाभ मिळावा म्हणून शाखेने वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्यकेंद्रांत जाऊन मातृत्व वंदन योजना, जननी सुरक्षा योजनेअंतर्गत खाती उघडली आहेत. एक सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यात २७७२ खातेदार झाले आहेत. विशेषत: डाकघरामधील बचत खाते आपल्या आयपीपीबी खात्याशी जोडून या सुविधेचा लाभ (पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी) ग्राहक घेऊ शकतो.

याचबरोबर एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, यूपीआय, एईपीएस या ठिकाणी पैसे हस्तांतरण करण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेला कोणत्याही कागदपत्रांच्या झेरॉक्सची गरज भासणार नाही.

असे मिळतात पैसे
कोणत्याही खातेदाराला एस. एम. एस. बँकिंग, मिस्ड कॉल आणि टोल १५५२९९ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा लागतो. त्यानंतर पोस्टमन संबंधित खातेदाराला घरपोच पैसे देतो. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते.

गोवा परिक्षेत्र (१ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २०१८ अखेर)
जिल्हा खातेदार
गोवा (पणजी ३०६२ व मडगांव १७२१) ४७८३
कोल्हापूर २७७२
सांगली २०८०
रत्नागिरी १३९५
सिंधुदुर्ग (मालवण) ७४४
एकूण ११७७४

वैशिष्ट्ये
ग्राहकांना घरामधून बाहेर निघण्याचीसुद्धा आवश्यकता राहणार नाही.
वेळ वाचणार.
या ठिकाणी सध्या सेवा
रमणमळा मुख्य डाकघर
मार्केट यार्ड
पंचगंगा रुग्णालयाजवळील शुक्रवार पेठ
हेर्ले (ता. हातकणंगले)
उचगाव (ता. करवीर)
 

आयपीपीबी ही घरपोच बँकिंग सुविधा ग्रामीण भागातील लोकांना फायदेशीर ठरणार आहे. आता लवकरच शहरात पाच, तर गडहिंग्लज येथे दोन अशा एकूण सात ठिकाणी सेवाकेंद्रे सुरू करणार आहे. - अमोल कांबळे, वरिष्ठ प्रबंधक, आयपीपीबी, कोल्हापूर शाखा.

Web Title: 2,727 account holders in the second month of 'India Payments'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.