‘राजर्षी शाहू शिष्यवृत्ती’पासून राहणार १३ हजार विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 04:29 PM2019-01-18T16:29:46+5:302019-01-18T16:32:07+5:30

अपुरी कागदपत्रे आणि अर्जांतील त्रुटींमुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १३ हजार ९५२ विद्यार्थी हे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती’पासून वंचित राहणार आहेत. दोन आठवड्यांत त्यांनी त्रुटींची पूर्तता केली नाही, तर त्यांना या शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे.

13,000 students from Rajarshi Shahu Scholarship will be deprived | ‘राजर्षी शाहू शिष्यवृत्ती’पासून राहणार १३ हजार विद्यार्थी वंचित

‘राजर्षी शाहू शिष्यवृत्ती’पासून राहणार १३ हजार विद्यार्थी वंचित

Next
ठळक मुद्दे‘राजर्षी शाहू शिष्यवृत्ती’पासून राहणार १३ हजार विद्यार्थी वंचितअर्जात त्रुटी, कागदपत्रे अपुरी; शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील स्थिती

संतोष मिठारी

कोल्हापूर : अपुरी कागदपत्रे आणि अर्जांतील त्रुटींमुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १३ हजार ९५२ विद्यार्थी हे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती’पासून वंचित राहणार आहेत. दोन आठवड्यांत त्यांनी त्रुटींची पूर्तता केली नाही, तर त्यांना या शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी शासनाने केलेल्या आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर अर्ज भरले. कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे आतापर्यंत ५४ हजार १७ अर्ज दाखल झाले. त्यांंपैकी ४० हजार ६५ अर्ज पात्र ठरले आहेत. उर्वरित १३ हजार ९५२ विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत.

अर्जासमवेत अपुरी कागदपत्रे जोडणे, अर्ज भरताना झालेल्या त्रुटी ही कारणे आहेत. ज्या अभ्यासक्रमांना संबंधित योजना लागू नाही, अशा काही विद्यार्थ्यांनीदेखील अर्ज केले आहेत. या शिष्यवृतीबाबत विद्यार्थी, महाविद्यालयात शिष्यवृत्तीचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शिक्षण सहसंचालक कार्यालय, शिवाजी विद्यापीठाने गेल्या सहा महिन्यांपासून महाविद्यालय, विद्यापीठातील विविध अधिविभागांमध्ये मार्गदर्शन शिबिर घेतले. त्याचा परिणाम म्हणजे यावर्षी संबंधित योजनेसाठी अर्ज करणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढली.

विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. त्यांनी दि. ३१ जानेवारीपूर्वी महाविद्यालयांमध्ये संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

जिल्हा          भरलेले अर्ज (हजारांत)             पात्र ठरलेले अर्ज
कोल्हापूर              २१,१९७                            १५६८०
सांगली                १३२५९                              १०२१४
सातारा                १९५६१                             १४१७१

योजना आहे अशी

या योजनेअंतर्गत शासन अनुदानित (शासकीय अभिमत विद्यापीठांसह), खासगी विनाअनुदानित (खासगी अभिमत, स्वयं अर्थसाहाय्य विद्यापीठे वगळून) महाविद्यालये अथवा तंत्रनिकेतनमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना (व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशित विद्यार्थी वगळून) शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये सवलत मिळते. त्यात पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.


सहसंचालक कार्यालय, विविध महाविद्यालये, शिवाजी विद्यापीठाने संयुक्तपणे प्रयत्न केल्याने या शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज वाढले आहेत. पात्र ठरलेले अर्ज मान्य करून उच्च शिक्षण संचालनालयाला पाठविले आहेत. ज्यांनी अद्याप अर्ज केलेले नाहीत. ज्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत, अशा विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारीपूर्वी त्यांची पूर्तता करावी.

उच्च शिक्षण सहसंचालक, कोल्हापूर - डॉ. अजय साळी, विभाग.

 

Web Title: 13,000 students from Rajarshi Shahu Scholarship will be deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.