महावितरणच्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई राहणार सुरू, सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र

By अनिकेत घमंडी | Published: March 28, 2024 04:22 PM2024-03-28T16:22:09+5:302024-03-28T16:22:09+5:30

 डोंबिवली: आर्थिक वर्षाच्या अखेरीस वीजबिल थकबाकी कमी करण्यासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम कल्याण परिमंडलात सुरू आहे. सुट्टीच्या ...

The action to cut off the electricity supply of Mahavitran arrears will continue, the electricity bill payment center will continue even on holidays. | महावितरणच्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई राहणार सुरू, सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र

महावितरणच्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई राहणार सुरू, सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र


 डोंबिवली: आर्थिक वर्षाच्या अखेरीस वीजबिल थकबाकी कमी करण्यासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम कल्याण परिमंडलात सुरू आहे. सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम सुरू राहणार असून संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

अधिकृत वीजबिल भरणा केंद्रासह महावितरणचे मोबाईल ॲप, संकेतस्थळ तसेच विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करून घरबसल्या विजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधाही ग्राहकांना उपलब्ध आहे. ग्राहकांनी अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी मार्च अखेरपर्यंत सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. त्यानुसार कल्याण परिमंडलांतर्गत सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शुक्रवार, शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी सुरु राहतील. उपलब्ध सुविधेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी आपल्या चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Web Title: The action to cut off the electricity supply of Mahavitran arrears will continue, the electricity bill payment center will continue even on holidays.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.