रिंग रोड प्रकल्पबाधितांना केडीएमसीकडून १७ कोटीचे टीडीआर वाटप

By मुरलीधर भवार | Published: February 27, 2023 02:52 PM2023-02-27T14:52:32+5:302023-02-27T14:53:09+5:30

महापालिका अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे. हे प्रकल्प राबवित असताना त्या प्रकल्पात अनेकांच्या जागा बाधित हाेता.

TDR allocation of 17 crores from KDMC to Ring Road project affected people | रिंग रोड प्रकल्पबाधितांना केडीएमसीकडून १७ कोटीचे टीडीआर वाटप

रिंग रोड प्रकल्पबाधितांना केडीएमसीकडून १७ कोटीचे टीडीआर वाटप

googlenewsNext

डाेंबिवली-कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या रिंग राेड प्रकल्पातील बाधितांना जागेच्या बदल्यात टीडीआर देण्याचे शिबीर काल माेठा गाव ठाकूर्ली परिसरात आयाेजित करण्यात आले हाेते. या शिबिराला १५० बाधितांनी उपस्थिती लावली. या शिबीरात ११ जणांना विवरण पत्राचे वाटप करण्यात आले. १७ कोटीचे टीडीआर वाटप करण्यात आले.

महापालिका अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे. हे प्रकल्प राबवित असताना त्या प्रकल्पात अनेकांच्या जागा बाधित हाेता. या प्रकल्प बाधितांना एका छत्राखाली आणून त्यांच्याकडून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे त्यांना बाधित जागेच्या बदल्यात टीडीआर देण्याचे आदेश कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे. त्यांच्या आदेशानुसार कल्याण डेांबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी पुढाकार घेत काल माेठा गाव ठाकूर्ली परिसरातील दत्त मंदिर परिसरात शिबीराचे आयाेजन केले हाेते. आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी आयाेजित केलेल्या या शिबीरात महापालिकेच्या सहाय्यक संचालक नगररचनाकार दिक्षा सावंत यांच्यासह नगररचना विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित हाेता. ३० टक्के टीडीआर जागच्या जागी देण्यात आला. जवळपास ४० जणांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रूटी आढळून आल्याने त्याच्या पूढील पूर्ततेसाठी त्यांना महापालिका मुख्यालयात बाेलाविण्यात आले आहे. या शिबीरामुळे महापालिकेस एका दिवसात ८ हजार चाैरस मीटर जागेचा ताबा घेता आला. काही नागरीकांचे सातबारा परिपूर्ण नसल्याने ते देखील या शिबीरात काढून देण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून १७ काेटी रुपयांचे टीडीआर वाटप करणयात आले.

यापूर्वीही माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी रिंग राेडच्या माेठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी या तिसऱ्या टप्प्याच्या भूसंपादन प्रक्रियेकरीता शिबीर राबविले हाेते. ७५ टक्के पेक्षा जास्त भूसंपादन झाल्याने या तिसऱ्या टप्प्याची निविदा काढणे एमएमआऱडीएला शक्य झाले. आत्ता उर्वरीत भूसंपादनची प्रक्रिया पूर्ण करण्याकरीता कालचे शिबीर हे महत्वपूर्ण ठरले आहे. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण हाेण्यास मदत हाेणार आहे.

Web Title: TDR allocation of 17 crores from KDMC to Ring Road project affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.