कल्याणमधील श्रीराम मंदिराची प्रतिकृती; भक्तांसाठी आठवडाभर दर्शनासाठी खुली

By मुरलीधर भवार | Published: January 23, 2024 06:13 PM2024-01-23T18:13:57+5:302024-01-23T18:14:08+5:30

अयोध्येला जाणे शक्य नसणाऱ्या रामभक्तांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे.

Replica of Sri Ram Temple in Kalyan; Open for devotees for darshan throughout the week | कल्याणमधील श्रीराम मंदिराची प्रतिकृती; भक्तांसाठी आठवडाभर दर्शनासाठी खुली

कल्याणमधील श्रीराम मंदिराची प्रतिकृती; भक्तांसाठी आठवडाभर दर्शनासाठी खुली

कल्याण-कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील गुण गोपाल मैदानात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि श्री राम जन्मभूमी उत्सव समितीतर्फे श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. कालच्या अभूतपूर्व प्रतिसादनंतर हे मंदिराची प्रतिकृती दर्शनाकरीता भक्तांसाठी आठवडाभर खुली राहणार आहे.

अयोध्येला जाणे शक्य नसणाऱ्या रामभक्तांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. काल दर्शनाकरीता भक्तांची एकच गर्दी उसळली होती. ही मंदिराची प्रतिकृती भक्तांसाठी दर्शनाकरीता आठवडाभर खुली राहणार असल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे. प्रतिकृती रामभक्तांसाठी खुली राहणार असल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली.

मंदीर प्रतिकृतीच्या दर्शनासाठी दररोज हजारो रामभक्त येत आहेत. काल मंदिराशेजारी असले्लया मैदानात जय श्रीराम हे काव्यात्मक नाट्य पाहण्यासाठी रामभक्तांची गर्दी केली होती. सुप्रसिद्ध कलाकार पुनीत इस्सार यांची प्रमुख भूमिका असलेल्या अत्यंत सुंदर अशा महानाट्याचा खासदार शिंदे यांनीही आनंद लुटला. यावेळी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी कारसेवा करणाऱ्या कल्याण पूर्वेतील ज्येष्ठ कारसेवकांचा खासदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 

Web Title: Replica of Sri Ram Temple in Kalyan; Open for devotees for darshan throughout the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.