PHOTOS: गोपाला गडी या रे या..! गोव्यात चिखलकाला उत्सव

By admin | Published: July 6, 2017 11:11 PM2017-07-06T23:11:05+5:302017-07-06T23:14:46+5:30

गोव्यातील माशेल गावात दरवर्षी चिखलकाला साजरा करतात. देव-देवतांचा परिसर म्हणून माशेल गाव ओळखले जाते. गावातील देवकीकृष्ण

PHOTOS: Gopala Gadi or Ray Ya ..! The mud-festive festival in Goa | PHOTOS: गोपाला गडी या रे या..! गोव्यात चिखलकाला उत्सव

PHOTOS: गोपाला गडी या रे या..! गोव्यात चिखलकाला उत्सव

Next

ऑनलाइन लोकमत

गोवा, दि. 06 -  गोव्यातील माशेल गावात दरवर्षी चिखलकाला साजरा करतात. देव-देवतांचा परिसर म्हणून माशेल गाव ओळखले जाते. गावातील देवकीकृष्ण मंदिराजवळ हा चिखलकाला साजरा करण्यासाठी सकाळी लोक एकत्र येतात. या मंदिरात देवाला गाऱ्हाणे घालतात आणि या मजेशीर खेळाला प्रारंभ होतो. श्रीकृष्णाच्या जन्माशी, जीवनाशी संबंधित संदर्भ या चिखलकाला खेळाशी आहेत. जमलेले लोक आसपासच्या दुकानात जातात आणि अंगाला तेल चोपतात. दुकानदारही त्यांना आनंदाने तेल देतात आणि मग भाविक चिखलकाल्यात मनसोक्त खेळ खेळतात. यानिमित्ताने भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम मंदिरात होतात. चिखलकाल्याचा समारोप दहीहंडीने होतो. पाऊस नसेल तर टँकरने पाणी आणून हा आनंद साजरा केला जातो. यंदा टँकर मागवला होता. गोपाला गडी या रे या...गाणे गायले जाते.

(सर्व छाया : गणेश शेटकर, पणजी )

Web Title: PHOTOS: Gopala Gadi or Ray Ya ..! The mud-festive festival in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.