मोबाइलवर महिलांचे फोटो काढताना युवकास पब्लिक मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:26 PM2018-05-25T22:26:41+5:302018-05-25T22:26:41+5:30

उत्राण ते पाचोरा दरम्यान बसमधील घटना

Yuccas Public Kill for taking photos of women on mobile | मोबाइलवर महिलांचे फोटो काढताना युवकास पब्लिक मार

मोबाइलवर महिलांचे फोटो काढताना युवकास पब्लिक मार

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा, जि.जळगाव, दि. २५ : चोपडा-पाचोरा बसमध्ये मोबाइलवर शाळकरी मुलींचे व महिलांचे फोटो काढताना तसेच शूटिंग करणाऱ्या एका ३३ वर्षीय युवकास मुलींनी रंगेहात पकडून बसमध्येच चोप दिला. शुक्रवारी सकाळी अकराला उत्राण ते पाचोरा दरम्यान ही घटना घडली. शाहिद राझा रा. असे या युवकाचे नाव आहे.
चोपडा-पाचोरा बस शुक्रवारी सकाळी उत्राण ते पाचोरा दरम्यान मार्गाक्रमण करीत होती. तेव्हा एक युवक मोबाइलद्वारे शाळकरी मुलींचे व महिलांचे फोटो व शूटिंग करीत असताना आढळला. मुलींनी त्या युवकास पाहिले व रंगेहात पकडून बसमध्येच चोप दिला. यामुळे धावत्या बसमध्ये गोंधळ वाढला. यानंतर हा प्रकार पाहून बसचालकाने बस थेट पाचोरा पोलीस ठाण्यात आणली.
या वेळी या युवकास पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याची चौकशी केली असता शाहिद राझा (वय ३३) हा बिहारी युवक चोपडा येथून पाचोºयाकडे येत होता. तो कुºहाड येथे मशिदीत मौलाना म्हणून काम करण्यासाठी जात होता. चौकशीत त्याने सांगितले की मोबाइलवर बोलत असताना चुकून कॅमेरा सुरू झाला. मात्र माझा तसा उद्देश नव्हता. याप्रकरणी या युवकावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन सोडून देण्यात आले.

Web Title: Yuccas Public Kill for taking photos of women on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.